पान:तुकारामबोवा.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीसरस्वती मंदिर.

काय मी पामर जाणें अर्थभेद ? ।
वदवी गोविंद, तेंची वदें. ॥ ३ ॥
निमित्त मापासी बैसविलों आहें; ।
मी तों कांहीं नव्हें स्वामिसत्ता. ॥ ४ ॥
तुका म्हणे, आहे पाईकची खरा, ।
वागवितों मुद्रा नामाची है. ॥ ५ ॥

 * तुकारामबाबांच्या सर्वच अभंगांवर त्यांच्या चारित्र्याचा, त्यांच्या मनःस्थितीचा, त्यांच्या प्रेमळ प्रकृतीचा व स्वानुभवाचा असा कांहीं विलक्षण ठसा उठलेला आहे कीं, तुकारामबोवा ही व्यक्ति व त्यांच्या कृतीची गाथा, यांत वेगळेपणा करितांच येत नाहीं. असा प्रकार वामनपंडित व मुक्तेश्वर यांचा नाहीं. त्या व्यक्ति बहुतेक नष्टच झालेल्या आहेत. त्यांच्या कृतीची- त्यांच्या काव्याची-आम्हांला ओळख होते, पण त्यांत त्यांच्या चारित्र्याचें, त्यांच्या व्यक्तिवैशिष्याचें, ठळक दर्शन कोठेही होत नाहीं. एकादें सुंदर, उज्ज्वळ, ताजें फूल झाडांमध्यें फुललें असावें व त्याचा मनोमोहक सुगंध आपल्याला यावा, म्हणजे त्याचें प्रत्यक्ष दर्शन घडण्यासाठी आपण त्यास मोठ्या उत्सुकतेनें इकडे तिकडे शोधूं लागतों; परंतु त्याचा थांग लागला नाहीं म्हणजे जशी अंतःकरणाला तळमळ लागून आपला


 *"If intense personal religion can be found anywhere, it can be found in Tukaram. It is impossible to avoid com- paring his songs with the Palms of David. They are the natural expression of a mind holding constant communion with God, poured out like the notes of a bird, in all the Occasions and various modes of life,"

-Sir Alexander Grant.