पान:तुकारामबोवा.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा

निर्माण करण्यावरच त्यांचा कटाक्ष आहे. परंतु प्रस्तुत लेखाचा विषय जे तुकारामबोवा, यांचा आपला अगदीं तृतीय पंथ आहे. पंडित व मुक्तेश्वर यांप्रमाणेंच बोवाही महाभक्तच आहेत, किंबहुना, ते मूर्तिमान् भक्तिरसच आहेत असें म्हटलें । तर अधिक शोभणारें आहे. तुकारामबोवा पांडित्याकडे ढुंकूनही " पहात नाहींत. वादविवादाचा त्यांना मनापासून तिटकारा.

धाई अंतरींच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें. ॥ १ ॥
विधिनिषेध उरफोडी, । जंव नाहीं अनुभवगोडी. ॥ २ ॥
वाढे तळमळ उभयता, । नाहीं देखिलें अनुभवितां ॥३॥
अपुल्या मतें पिसें । परी तें आहे जैसें तैसें ॥ ४॥
साधनाची सिद्धी । मौन, करां स्थिर बुद्धी. ॥ ५ ॥
तुका म्हणे, वादें । वायां गेलीं ब्रह्मवृंदें. ॥ ६॥

असा तुकारामबाबांचा नित्याचा बाणा. त्यांना पंडितांची व्यु- त्पत्तिसिद्धता नको व मुक्तेश्वरांचीं रसभरित आख्यानेही नकोत. पंडितांची वाणी तेजाळ, कठोर व साथी आहे; मुक्तेश्वरांची सरस्वती रसस्नात, ठसकेदार व प्रौढ आहे; तुकारामबोबांचा वाग्विलास केवळ जिव्हाळ्याचा, तळमळीचा व भेदक आहे. पंडित, मुक्तेश्वर व तुकारामबोचा, यांमधील तिसरा भेदप्रकार असा आहे कीं, पहिले दोन बहुशः बहिर्मुख वृत्तीचे आहेत, तर तुकरामबोवांची वृत्ती निरंतर अंतर्मुख आहे. तुकाराम- बोवांच्या काव्यांत जिकडे तिकडे त्यांच्या अंतःकरणाचें-मनो- रचनेचें - स्पष्ट प्रतिबिंब वठलेलें आहे. कौपर कवी विषयीं एका टीकाकारानें म्हटलें आहे कीं, "त्याच्या अंगचे सात्त्विक गुण हीच त्याच्या काव्यांतील जादू आहे; आणि तुकारामबोवांच्या


 *His virtues formed the magic of his song.