पान:तुकारामबोवा.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.

२९

आणण्यासाठींच संकटांची आवश्यकता असते असें नाहीं. दुराग्रही, अहंमन्य व गर्वाव्य प्रकृतीच्या ठिकाणीं सरलता, लीनता, सौम्यपणा, व सदयता, यांचा ठसा उमटविण्या- साठीं दुर्दैवाचे निर्घृण निर्घात अवश्य आहेत, हें तत्व आम्हांला कबूल आहे. परंतु ज्या सुशील सज्जनांना वांका शब्द लावण्यास किंवा यत्किंचितही अपाय करण्यास आपलें मन धजणार नाहीं, त्यांचेही सत्त्व व तेज हीं पारखण्यास व उजळ करण्यास ईश्वरीसत्ता, संकट, दुःख, इत्यादि परं- परांचीच योजना करते. अगदीं निर्दोष, निःस्वार्थ व नवजात बालकाप्रमाणें शुद्ध अशा सदाचारी व्यक्तींचें खरें तेज, गुण, प्रभाव, व पवित्रता, हीं व्यक्त करून त्यांना परमावधीला नेण्याला - त्यांची पराकाष्ठा करण्याला -क्लेश अर्थ यांचा बिनमोल उपयोग झालेला आहे. या व्यक्तींचें वास्त- विक स्वरूप प्रकट होऊन, त्यांच्या उदाहरणीय चारित्र्याचें योग्य महत्त्व जगाच्या डोळ्यांत भरण्याला क्लेश व दु:ख हेच राजमार्ग होत, असें म्हटलें असतांही साजण्यासारखें आहे. जर मानवी आत्म्याच्या उन्नतीला दृश्य मर्यादाच बांधतां येत नाहीं, तर मग ती उन्नति अमुक एक मार्ग - नेंच झाली पाहिजे, ती सुखभोगापासूनच व्हावी, दुःखक्लेशांपा- सून होऊ नये, अशा तऱ्हेचा सिद्धांत तरी आपल्याला कसा घालतां येईल ? तुकारामत्रोबांसारख्या लोकोत्तर महा- त्म्यांची प्रकृतिच अशी कांहीं विलक्षण असते कीं, तिला


So each his sufferings; all are men
Condemned alike to groan,
The tender for another's pain,
The unfeeling for his own.