पान:तुकारामबोवा.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
श्रीसरस्वती मंदिर.

जितकी आंच पोंचेल, जितकें घर्षण, उच्छेदन, व ताडन, होईल, तितकी तिची तेजस्विता अधिक चकाकूं लागते, असें जर म्हणू नये, तर पुढील उद्गारांची कशी बरें फोड करितां येईल:-

"बाप मेला न कळतां । नव्हती संसाराची चिंता. ॥१॥
बाईल मेली, मुक्त झाली, । देवें माया सोडविली. ॥ २ ।
विठो ! तुझें माझें राज्य, । नाहीं दुसऱ्याचें काज. ॥ ३ ॥
पोर मेलें, बरें झालें, । देवें मायाविरहित केलें. ॥ ४ ॥
माता मेली मज देखतां । तुका म्हणे, हरिली चिंता.”॥५

"बरें झालें, देवा ! निघालें दिवाळें ।
बरी या दुष्काळे पीडा केली. ॥ १ ॥
अनुतापें तुझें राहिलें चिंतन, ।
जाला हा वमन संवसार. ॥ २ ॥
बरें झालें, देवा ! बाईल कर्कशा, ।
बरी ही दुर्दशा जनांमध्यें ॥ ३ ॥
बरें झालें, जगीं पावलों अपमान, ।
बरें गेलें धन, ढोरें, गुरें. ॥ ४ ॥
बरें झालें नाहीं धरिली लोकलाज, ।
बरा आलों तुज शरण, देवा ! ॥ ५ ॥
बरें झालें, तुझें केलें देवाईल, ।
करें बाईल उपेक्षली. ॥ ६ ॥ तुका म्हणे, बरें व्रत एकादशी,
केलें उपवासी जागरण. ॥ ७ ॥

 हे उद्गार म्हणजे मूर्तिमंत विरक्ति व शांततेची परमा- वधि आहेत. भक्तिपूर्ण, वैराग्यशील, टक्केटोणपे खाऊन