पान:तुकारामबोवा.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
श्रीसरस्वतीमंदिर.


अंधकूपांत पडलेल्या तुकारामबोवांच्या दुःखाला व लाजेला पारच नाहीं असें झालें. इतक्यांत त्यांची पहिली बायको रखमाबाई दुष्काळांत 'अन्न अन्न ' करून मेली. त्यांचा मोठा मुलगा शिवाजी हाही गुदरला. ज्येष्ठ बंधु सावजी याचीही बायको वारली व तो स्वतः संसारावर तुळशीपत्र ठेवून जो कोठें परागंदा झाला, तो कांहीं पुन्हां आला नाहीं.असा संकटांचा पाऊस कोसळल्यावर तुकारामबोवांच्या मनानें संसा- विषय पूर्ण उलट खाल्ली.आपण आजपर्यंत ज्यांत सुख मानून गुंतलों होतों, तो केवळ सुखाभास होता, खरें सुख नव्हते, अशी त्यांची खात्री पटली.त्यांचें मन आतां खऱ्या सुखाचा ठाव पाहण्यासाठी तळतळूं लागलें. संसारदुःखानें पोळून ते मुमुक्षूच्या पदवीस पोहोंचले व त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अर्धास सुरुवात झाली. या वेळीं त्यांचें वय एकवीस वर्षांचें होतें.
 तुकारामबोवांसारख्या संतजनांच्या चरित्राचें विवरण करितांना त्यांना काय सुख लाभलें, त्यांना आनंदाचा वांटा किती मि- ळाला, त्यांचा संसारांत भाग्योदय कसा झाला, त्यांनी किती संपत्ति सांठवली, इत्यादि गोष्टींचा विचार करून बरोबर - किंब - हुना मुळींच भागणार नाहीं. तरं, त्यांनीं कायकाय संकटें भो- गलीं, त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग कोसळले, दुःखाच्या भट्टींत हीणकस खाक होऊन सुवर्णधातूचें उजळ स्वरूप कसकसें ठळक होत गेलें, दुर्दैवाच्या घनप्रहारांनी त्यांची मनोरचना कसकशी बनत गेली, या गोष्टींचा आढावा काढणें ही महत्वाची बाब आहे. * दुष्ट व पापी प्रकृतींना ताळ्यावर


 * ग्रे कवीच्या पुढील पंक्ति या विषयासंबंधानें वाचनीय आहेत:-