पान:तुकारामबोवा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
श्रीसरस्वती मंदिर.

 सावजीनें असा रोकडा जबाब दिला, तेव्हां बोल्होबांची क्त्याच्या संबंधानें अगर्दीच निराशा झाली. अर्थात् तुकाराम हाच काय तो आतां त्यांच्या आशेचा आधारस्तंभ राहिला. तुकारा- मबोवांचें वय या वेळीं केवळ तेरा वर्षांचें होतें; कान्होबा तर अगदीच लहान होता. तेव्हां बोल्होबांनी संसाराचें सर्व ओझें तुकारामबाबांच्याच अंगावर टाकिलें. तुकारामबोत्रांचा ओढा मूळापासूनच जरी वैराग्याकडे व ईशभक्तीकडे होता, तरी सावजीएवढी त्यांची अद्याप तयारी झाली नव्हती. शिवाय व्याव- हारिक शिक्षण त्यांना मिळाले असल्यामुळे संसाराचा गाडा आपण हांकून आईबापांचा भारउतार केला पाहिजे अशी त्यांची भावना झालेली होती. तेव्हां बोल्हाबांनीं प्रपंचाचा आटोप करण्याविषयीं बोबांना गळ घातली असतां, त्यांचा निषेध करून 'एकदम साफासाफी करणें त्यांना कोणत्याही प्रकारें इष्ट दिसलें नाहीं. आईबापांची योग्य आज्ञा पाळून त्यांना सुखी करणें, हें - सामान्य तत्त्व तुकारामबोवांच्या मनावर उत्तम ठसलेलें होतें. -

"मायबापें केवळ काशी, । तेणें नवजावें तीर्थासी. ॥१॥
पुंडलीकें काय केलें ? ॥ परब्रह्म उभे ठेलें ॥ २ ॥
तैसा होई सावधान, । हृदयीं धरीं नारायण ॥ ३॥
तुका म्हणे, मायबापें । अवघीं देवाची स्वरूपें .” ॥ ४ ॥

असे उद्गार त्यांनी काढले आहेत. तेव्हां सावजीचें कृत्य त्यांना त्या वेळीं योग्य वाटलें नाहीं, असेंच म्हणणें प्राप्त आहे. तुकारामबोवांनीं प्रपंचाचा भार आपल्या शिरावर घेतला व बापाच्या देखरेखीखाली संसाराचा आटप चांगलाच केला. तुकारामबोवांचें याच्या पूर्वौच पहिले लम झालें होतें. या बाय-