पान:तुकारामबोवा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
श्रीसरस्वती मंदिर

 तुकारामबोवांचे वडील पंढरीचे वारकरी होते. तेव्हां तुका • रामबोवांना लिहिण्यावाचण्याचा संस्कार होऊन, ज्ञानदेव नामदेवादि साधुसंतांच्या अभंगात्मक व ओवीछंदात्मक वाङ्मयाचा सहजच परिचय झाला होता.
 बोल्होबा जसे परम भगवद्भक्त होते, तसे प्रपंचांतही हुशार व टापटिपीचे होते. त्यांचा वडील मुलगा सावजी हा लहानपणा- पासूनच विरक्त बुद्धींचा होता; तेव्हां आपल्या प्रपंचाचा भार तुकारामावरच पडणार हें ते जाणून होते. त्यामुळे त्यांनी उदीमव्यापाराचें शिक्षण तुकारामबोवांना चांगलें दिलें होतें.. 'हिशोबठिशोब ठेवणें, माल नेणें आणणें, विक्रीखरेदी करणें, ब्याजबट्टा चालविणें, वगैरे गोष्टींची माहिती तुकारामबोवांना चांगली झालेली. होती. आपला संसार तुकारामानें यथायोग्यः पद्धतीने चालवून, व्यापारव्यवहार भरभराटीस आणावा, अशी इच्छा धरून, मातापितरांनीं तुकारामबोवांना त्या कामी तरबेज केलें होतें. पुढें संसारांतील प्रत्येक गोष्टीनें उलट खाऊन, जेव्हां तुकारामबाबांवर दुर्धर प्रसंग कोसळले, तेव्हां त्यांना, लौकिकाचा व संसाराचा पूर्ण तिटकारा आला व आपल्या वडिलांनीं नसतेंच शिक्षण देऊन आपल्यास भलत्याच भरीस पाडलें, अशा तऱ्हेचे उद्गार त्यांनी काढले आहेत:-

"हित नाहीं ठावें जननीजनका ।
दाविला लौकिकाचार तींहीं ॥ १
आंधळ्याचे पाठी लागले आंधळे, ।
घात एका वेळे पुढेमागें ॥ २
न धरावी चाली, करावा विचार, ।
वरील आहार गळीं लावी. ॥ ३