पान:तुकारामबोवा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०.
श्रीसरस्वती मंदिर.

जळो ते जाणीव, जळो त्यांचे दंड, ।
जळो त्यांचें तोंड दुर्जनांचें ॥ २
तुका म्हणे, येती दाटूनी छळाया, ।
त्यांच्या बोडूं डोया, न धरूं भीड, ' ॥ ३

अशा तऱ्हेचे बेपर्वाईचे ठांसून काढलेले उद्गार सर्व संतांच्या कवितांत आढळतात. तेव्हां अशा अहंकाराचा आविर्भाव करणारें व वरपांगीं नसत्या भेदभावाच्या भरीस पाडणारें वेद- शास्त्राध्ययनाचें लटांबर आपल्या शूद्रत्वामुळे आपल्या पाठीशी लागलें नाहीं, म्हणून तुकारामबोवांनी-

'बरा कुणबी केलों, । नाहीं तरी दर्भे असतों मेलों. ॥ १
भलें केलें, देवराया ! । नाचे तुका, लागे पायां. ॥ २
विद्या असती कांहीं, । तरी पडतों अपायीं ॥ ३
सेवा चुकतों संतांची, । नागवण हे फुकाची. ॥ ४
गर्व होतां ताठा । जातों यमपंथें वाटा. ॥ ५
तुका म्हणे, थोरपणें । नरक होती अभिमानें ॥ ६

अशा प्रकारें औपरोधिक, पण एका प्रकारें समाधानाचे, उद्गार काढले, तर त्यांत आश्चर्य मानण्यासारखें कांहींच नाहीं.
 वर सांगितलेंच आहे कीं, अशा प्रकारें कर्मकांडांत मोठ्या अभि- मानानें पडलेल्या दुराग्रही शब्दज्ञान्यांचा व भक्तिभावापुढें सर्व बाह्य भेदांना तुच्छ मानणाऱ्या साधुसंतांचा अनेक शतकेंपर्यंत जोरानें कलह चालू आहे, तरी त्याचा स्पष्ट निकाल अजूनपर्यंत लाग- लेला नाहीं. वेळोवेळी अशा कर्मठांना संतांनी वठणीस आणलेले आहे; तरी पण कर्मठपणाच्या बाण्यांतही एक प्रकारचें असें कांहीं विलक्षण तेज आहे कीं, त्याचा ठसा सामान्य समाजावरून साफ असा कधींच नाहींसा झालेला दिसत नाहीं. इतकेंच नव्हे,