पान:तुकारामबोवा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.

१९

पितरें फार भाविक होतीं व भागवतधर्मास अनुसरून तीं पर- मार्थसाधन करीत असत. तेव्हां भगवद्भक्तीचें बाळकडूंच तुकारामबोवांना मिळालें होतें, हें उघड आहे. साधुसंतांची सेवा करण्यांची गोडी त्यांना लहानपणापासूनच लागलेली होती. ते 'जातीनें शूद्र असल्यामुळे त्यांचे वाङ्मयात्मक शिक्षण फारच कोतें असणार, हें साहजिकच आहे. वेदशास्त्राचा अभ्यास तर त्यांना घडणें अशक्यच होतें. पण या गोष्टीचें तुकारामबोवांना एक प्रकारें समाधानच वाटत होतें. ज्ञानेश्वरांच्या काळापासून तों अगदीं मोरोपंतमहीपतींच्या काळापर्यंत, वेदशास्त्रप्रवीण, कर्मठ, कठोर बुद्धीचे, शब्दच्छळ करणारे, आत्म्याच्या उन्नतीपेक्षां बाह्य 'कसरतीलाच जास्त किंमत देणारे, अहंमन्यतेनें ताठलेले, असे ब्राह्मण व बाह्योपाधींना विसरून ईशभक्तीच्या रंगांत एकता - तेनें रंगून जाणारे भागवत साधुसंत, या दोघांमध्ये सारखा झगडा चाललेला महाराष्ट्र वाङ्मयांत दृष्टीस पडतो. पण या झगड्यांत अजूनपर्यंत अमुक एक पक्षाचा म्हणजे 'खास जय झाला आहे, असें सांगणें अशक्य आहे.
 व्यक्तिविशेषासंबंधानें पाहतां कर्मठ वैदिकपंडितांचे छळ सहन करून अखेर त्यांना संतजनांनीं आपल्या सत्त्वस्थ वृत्तीनें व भक्तीच्या जोरावर शरण आणिलें आहे. वेद- शास्त्राच्या शाब्दिक ज्ञानाने अहंमन्य झालेले व जिव्हाळ्याचा पाझर नसतां केवळ बाह्य कसरतींत गुंतलेले, असे जे कर्मठ, त्यांची या साधुसंतांनीं तिळमात्र पर्वा केली नाहीं, असें वारं- चार आढळते.

' शब्दज्ञानी येऊ नेदीं दृष्टीपुढें, |
 छळवादी कुठे अभक्त ते, ॥ १