पान:तुकारामबोवा.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
श्री सरस्वती मंदिर.

बसतो. 'तुकारामबोवांना एकविसाव्या वर्षी विपरीत काळ येऊन, त्यांच्या आयुष्याचें पूर्वार्ध संपलें हें भक्तविजयांतील महीपतिबोवांचे वचन संदिग्ध आहे, व त्यावरून निर्याणसमयीं तुकारामबोवा ४२ वर्षांचे होते, असें अनुमान काढणें निर्धास्त नव्हतें, हें उघड आहे. परंतु या अनुमानाला विघातक असें स्वतंत्र, निःसंदेह व विश्वासार्ह प्रमाण जोपर्यंत उपलब्ध नव्हतें, तोंपर्यंत तें प्रमाण सामान्यतः ग्राह्य होणें, हें साहजिक होतें. पण, महीपतीच्या अभंगाने व त्या अभंगाला रा. राजवाड्यांजवळील वंशावळीची पुस्ती मिळाल्यानें, आणि या दोहोंचा तुकारामबो- वांच्या स्वतःच्या उक्तींशीं बरोबर जम बसल्यानें, वरील अनु- मानाचा पूर्ण निरास होतो, व याउपर त्या अनुमानाला चिक- टून राहणें दुराग्रहद्योतक होईल असें आमच्या बुद्धीस वाटतें.


३. संसाराचा गुंता, दुर्धर प्रसंग.
( शा. श. १४९० - १९११.)

संसारें आलों अतिदुःखे दुःखी, ।
मायबाप सेखीं क्रमलिया. ॥
दुष्काळें आटिलें द्रव्य, नेला मान, ।
स्त्री एकी 'अन्न अन्न' करितां मेली. ॥
लज्जा वाटे जीवा, त्रासलों या दुःखें, ।
वेवसाय देखें तुटी येतां ॥

तुकारामबोवांना बाळपणीं कोणत्या तऱ्हेचे शिक्षण मिळालें होतें याची माहिती जरी कोठें आढळत नाहीं, तरी त्या संबंधानें कांहीं ठोकळ अनुमानें करण्यास पुष्कळ जागा आहे. बोबांचीं माता-