पान:तुकारामबोवा.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.

१७

 आतां शके १५२० विलंब संवत्सरांत मात्र शुद्ध दशमी गुरुवारी येते; पण शके १५२१, १५२२, १५२३ या संवत्सरांत ती गुरुवारी येत नाहीं. तेव्हां तुकारामबोवांचा उपदेशकाल शके १५२२ च्या सुमारास म्हणजे शके १५२० विलंब संवत्सरी माघ शु. १०, गुरुवार, हा खास ठरतो. आतां तुकारामबाबांना एकविसाव्या वर्षी पूर्ण उपरति होऊन ते खरोखर विरागी झाले, व त्यानंतर कांहीं वर्षांनी त्यांना गुरुप्रसाद लाभला. तेव्हां उपदेशकालीं त्यांचें वय २५-३० चे सुमारास असावें हें उघड आहे. यावरून तुकारामबोवांचा जन्म शा. श. १४९०-१४९५ चे सुमारास झाला असावा असें ठरतें.
 (२) रा. वि. का. राजवाडे यांस पंढरीतील तुकाराम- बोवांच्या वंशाचें शिष्यत्व पतकरणाऱ्या एका वारकऱ्याजवळ एक तुकारामबाबांची वंशावळ सांपडली, तींत तुकारामबाबांचा जन्म शा. श. १४९० त झाला, असें स्पष्ट लिहिलें आहे.
 तुकारामबोवांचा जन्मशक १४९० धरिला, म्हणजे निर्याण- काळी (शा. श. १५७१ त ) ते ८१ वर्षांचे होते असें ठरतें; व त्याचा

'जराकर्णमूळी सांगों आली गोष्टी,।
मृत्यूचिये भेटी जवळ आली ' ।

" बहुकाळ माझा केलासे सांभाळ' ।
पांडुरंगें मूळ पाठविलें ॥

अशा प्रकारच्या तुकारामबाबांच्या *उक्तींशी चांगला जम


 * बोवांनी छत्रपतींस पाठविलेल्या पत्रांतही,
' घेऊनियां भेटी, कोण हा संतोष ? । आयुष्याचे दीस गेले गेले. ॥
एक दोन्ही कर्मै जाणोनियां वर्मै । आपुलिया भ्रमें राहूं आतां ॥ '
असे उद्गार काढून आपला वृद्धापकाळ सूचित केला आहे.