पान:तुकारामबोवा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
श्रीसरस्वती मंदिर.

महीपति म्हणे, जाले समाधिस्थ,
तुकया क्रीडत ब्रह्मानंदें. ॥

 या अभंगावरून तुकारामबोवांना शके १५२३ चे सुमासार दृष्टांत होऊन गुरूपदेशः झाला हे उघड आहे. तुकारामबोवांनी आपल्याला गुरूपदेश कोणत्या दिवशीं व कोप्पत्या तिथीला झाला, हें पुढील अभंगांत सांगितलें आहे. -

सद्गुरुरायें कृपा मज केली, ।
परी नाहीं घडली सेवा कांहीं. ॥ १ ॥
राघवचैतन्य, केशवचैतन्य, ।
सांगितली खूण मालिकेची. ॥ ६ ॥
बाबाजी आपले सांगितलें नाम, ।
मंत्र दिला 'राम, कृष्ण, हरी.' ॥ ७ ॥
माघ, शुद्ध दशमी, पाहुनी गुरुवार,।
केला अंगीकार, तुका म्हणे. ॥ ८ ॥


समाधिशक १३९३व तुकारामबोवांचा उपदेशकाल शके १४९३ धरला, तर एक नवीनच असंबद्धता उद्भवते. तुकारामबोवांना संसाराचा वीट एकविसाव्या वर्षी आला व त्यानंतर कांहीं वर्षांनीं त्यांना स्वप्नांत गुरू- पदेश झाला. तेव्हां उपदेशकालीं तुकारामबोवा अदमासें २६-२८ वर्षांचे असावेत. पण त्यांचा निर्याणशक १५७१ हा कायम आहे, तेव्हां तुकारामबोवा निर्याणकाला निदान १०४ - १०६ वर्षांचे होते, असें फलित होऊं पहाते. परंतु त्यांचे वय इतक्या अपवादक रीतीनें लांबलें होतें, असें मानण्याला कांहींएक प्रमाण नाहीं. एकंदरींत 'केशवचैतन्यकथा- तरूंतील चैतन्यसमाधिकाल व तुकारामबोवांचा उपदेशकाल हे दोन्ही चूक व असंबद्ध आहेत.