पान:तुकारामबोवा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.

१५

बैशाख वद्य द्वादशीचे दिनीं ।
समाधि स्वामींनी घेतलीसे. ॥ ३ ॥
तेथुन तीस वर्षा भेटी तुकयासी ।
देऊनी तयासी पूर्णपण. ॥ ५ ॥


व द्वादशी पर्व, । गुरुवासर ते दिनों ॥ ( ४ । १२१ ). यांतील मास व तिथि हीं महीपतीने दिलेल्या मासतिथींशी जुळती आहेत. परंतु शकामध्यें बरोबर एका शतकाचा फरक आहे. तथापि शके १३९३ त प्रजापति संवत्सर येत नसल्यामुळे व शके १४९३ त तो येत असल्यामुळे निरंजनबोवांच्या शक्र चुकीचा व टाकाऊ ठरतो, हें उघड आहे. तसेंच, केशवचैतन्यचरित्रांत अहमदनगरचा निजामशहा याचा उल्लेख आलेला आहे. राघवचैतन्य व केशवचैतन्य हे कलबुर्ग्यास गेले. असतां त्यांचा सिद्धिप्रताप निजामशहाच्या प्रत्ययास आला, अशी हकी- कत आढळते. अहमदनगरच्या निजामशहाच्या कबजांतून कलबुर्गा शके १४०५ च्या सुमारास विजापूरच्या अदिलशहाच्या हाती गेला.. तेव्हां शा. शकाच्या पंधराव्या शकाच्या उत्तरार्धात केशवचैतन्य हयात होते, हैं सिद्ध आहे. म्हणून निरंजनबोवांनी दिलेला शक खोटा ठरून, महीपतिबावांचा शक उघड खरा होतो.
 * निरंजनबोवांनीं तुकारामवोवांच्या उपदेशकालाचा असा उल्लेख केला आहे:- ' केशवचैतन्याची समाधी झालियावरी शतावे अब्दीं । तुकारामाचें ज्ञान समृद्धि । प्रत्यक्ष येऊन पैं केली. " ॥ ( ६ । १०९ ). वरील टीपेत केशवचैतन्याचा समाधिशक १४९३ आहे, तेव्हां तेथून बरोबर शंभराव्या वर्षी तुकारामबोवांना उपदेश झाला असे म्हटलें, तर उपदेशशक १५९३ हा येतो. परंतु तुकारामवोवांचा निर्याण- काल शक १५७१ हा सिद्ध असल्यामुळे शक १५९३ हा उपदेशकाल ठरणें वस्तुगत्याच अशक्य आहे. तेव्हां तुकारामबाबांचा उपदेश- काल व चैतन्यांच्या समाधिकाल, यांतील अंतरही निरंजनबुवांनी चुकी- चेंच दिलें आहे. पहिल्या चुकीमुळे दुसरी चुकी घडून आली असेही म्हणतां येत नाहीं. कारण, जर वादविवादार्थ घटकाभर केशवचैतन्यांचा