पान:तुकारामबोवा.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
श्रीसरस्वतीमंदिर.

शकाचा उल्लेख केलेला नाहीं.परंतु महीपतिबोवांनी 'भक्तविजयांत-

एकविसाव्यांत विपरीत काळ ।
"तुकयासी पातला तत्काळ । "

'पूर्वार्ध संपलें ऐशा रीती ।
दुःखें देखिलीं नानारीतीं । "

 असा उल्लेख केला आहे. त्यावरून तुकारामबाबांचें निम्मे वय संपलें, तेव्हां ते एकवीस वर्षांचे होते, म्हणून त्यांचे 'मरणसमयीं वय बेचाळीस वर्षांचें असलें पाहिजे असें अनुमान काढण्यांत आलें. बोवांचा मृत्युशक शा. श. १५७१ हा "सिद्ध आहे. तेव्हां शा. श. १९३० चे सुमारास त्यांचें जन्म 'झाले, असे चरित्रकारांनी ठरविलें व तोच शक आज बरीच 'वर्षे सर्वमान्य होता.
परंतु रा. त्रि० का ० राजवाडे यांनी या गोष्टीचा उत्तम 'शहानिशा करून शा. श. १४९० हा तुकारामबोवांचा जन्म- 'शक होय असे सिद्ध केलें आहे. यास प्रमाणे अशी आहेत:-
 (१) तुकारामबोवांना गुरूपदेश कधीं झाला याविषयीं `महीपति ताहाबादकरांचा एक अभंग प्रसिद्ध आहे. तो असा:-

'बाबाजी चैतन्य योगीराज धन्य ।
तुकयालागून प्रकटले. ॥ १ ॥
शालिवाहन शके चौदाशें * त्र्याण्णव ।
प्रजापति नाम संवत्सरी ॥ २ ॥


 *' केशवचैतन्यकथातरु' या ग्रंथांत निरंजनबोवांनी केशवचैतन्य ऊर्फ बाबांचतन्य यांच्या 'समाधिशकांचा उल्लेख असा केला आहे:- के तेरा व्याण्णव । प्रजापति संवत्सराचें नांव, 1 वैशास्त्र-