पान:तुकारामबोवा.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.

१३

नाहीं. प्रपंच व परमार्थ यांची उत्तम साजेशी सांगड घाल- णाऱ्यांपैकीं ते होते. त्यांनीं जसा परमार्थ आपलासा केला होता, तसा प्रपंचही चांगला थाटला होता. त्यांचे पूर्वज उदीमव्यापार करीत असत व यांनीही तोच व्यवसाय पुढें चालू ठेविला. बोल्होबांनीं सचोटीनें, नेकीनें व टापटिपीनें - वागून, आपला धंदा चांगलाच रंगारूपास आणला. त्यांचें देहू येथील दुकान उत्तम भरभराटीस आलें होतें व चारचौ- घांत त्यांची फार पत होती. व्याप पुष्कळ वाढला, संपत्ति बरीच जमली, लोकांत बोलवलायही चांगली झाली ; तरी पण, बोल्होबा आत्मभान विसरण्याइतके त्या गुंत्यांत गुरफटले गेले नाहींत किंवा त्यांच्या आचरणाचें पावित्र्य रेंसमात्र ढळलें नाहीं. कणकाई ही सुद्धां त्यांना विचारानें व आचारानें साजेशीच गृहिणी होती. तेव्हां अशा मातापितरांच्या पोटीं आल्यामुळे आनुवंशिक संस्काराने व गुरुजनांच्या प्रत्यक्ष आचरणानें तुका- रामबोवांच्या अंतःकरणांत जे संस्कारबीज पेरलें गेलें, तेंच पुढें प्रौढपणीं परिस्थितिप्रभावाने व्यक्तरूपास येऊन तुकारामबोवा हे जगद्वंद्य विभूति झाले, असें अनुमान करण्यास कांहीं एक हरकत नाहीं.

 तुकारामबोत्रांचा जन्मशक कोणता या संबंधाने बराच घोंटाळा आहे. 'हिंदुस्तानकथारस' या ग्रंथाच्या कर्त्यांनी शा. शक १९१० म्हणजे इ. स. १९८८ हा तुकारामबोवांचा जन्मशक दिला आहे. परंतु यास त्यांनी कोणताही आधार दिलेला नाहीं. निरंजनवावा, महीपति, किंवा रामदासस्वामींची बखर लिहिणारे हनुमंतस्वामी, यांनीं तुकारामत्रोवांच्या जन्म-