पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


त्यांस केवळ परमेश्वरस्वरूप सद्रू मानीत होते असे त्यांच्या अभंगां ( गाथेच्या आरंभी छापले आहेत ) वरून स्पष्ट दिसते. | तुकाराम बावा हे भजन करीत असत यास्तव त्यांच्या मागे टाळकरी वगैरे नेम- लेली मंडळी असे, तीही विरक्त, प्रेमळ भाविक आणि देवभक्त अशी होती. या मंडळींतील सर्व लोकांवर तुकारामबावांचे फार प्रेम असे, आणि ते तुकारामबावांवर आपल्या जिवापलीकडे प्रेम करीत असत. | हे तुकारामबाबांस जरी आपले गुरुप्रमाणे मानीत होते तरी त्यांस त्यांनी उप- देश दिला होता असे दृष्टोत्पत्तीस येत नाही. हे टाळकरी त्यांचे नुसते अनुयायी असावे असे वाटते. तुकारामबावांचे मधले बंधु कान्होबा हे या अनुयायांपैकी नसावे असे अनुमान होते; कारण निर्याणकाळी तुकारामबावांनी आपल्या टाळकरी अनुयायांस शेवटी निवानिरव केली त्याप्रसंगी असणा-या मंडळीमध्ये कान्होबाचें नांव नाही. याशिवाय कान्होबा हे त्यांचे अनुगृहीत होते असेही कळत नाही, परंतु ते तुकारामवावांवर अत्यंत प्रेम आणि श्रद्धा ठेवीत असत. यांनी जे अमंग केले होते त्यांतील थोडकेच सांप्रत उपलब्ध आहेत ते या गाथेत छापले आहेत. या अभंगांच्या शेवटील चरणांत आपणांस “तुकयाबंधु" असे दर्शविले आहे, त्याव- रून त्यांनी आपणांस तुकारामबावांचा ( आपल्या वडीलपणाची पायरी सोडून ) आश्रित असा भाव दर्शविला आहे. | तुकारामबावा कोणास अनुग्रह देण्याविषयी नरी फार सावध होते तरी त्यांस सच्छिष्य असावा अशी एके प्रसंगी इच्छा झाली होती असे त्यांच्या खालील अभंगावरून दिसून येते:--- देवा ऐसा शिष्य देई । ब्रम्हज्ञानी निपुण पाहीं ॥ १ ॥ जोकां भावाचा आगळा । भक्ति प्रेमाचा पुतळा ॥ २ ॥ ऐशा युक्ति ज्याला बाणे । तेथें वैराग्याचे ठाणें ॥ ३ ॥ ऐसा झाला हो शरीरी । तुका लिंबलोण करी ॥ ४ ॥ कृपा करावी भगवतें । ऐसी शिष्य द्यावा मातें ॥ १ ॥ माझे व्रत जो चालवी । यासी द्यावें त्वां पालवी ॥ २ ॥ व्हावी ब्रम्हज्ञानी गुंडा । तिहीं लोक ज्याचा झेंडा ॥ ३ ॥ | तुको तुका हाक मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥ ४ ॥ परंतु, त्याला त्याचे इच्छेप्रमाणे शिष्य मिळाला किंवा कोणास त्यांनी अनुग्रह दिला असे प्रमाण कोठे मिळत नाहीं. --