पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/8

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


प्रस्तावना, महाराष्ट्र देशांत मुकुंदराजादि जेवढे साधु होऊन गेले. त्यांच्या चरित्रांवरून ( एक रामदासस्वामी शिवायकरून आपआपले सांप्रदाय चालू राखण्यासाठी शिष्य- मंडळी वाढविली असे दिसून येत नाही. त्यांनी उत्तम पात्र पाहून त्यास अनुग्रह दिल्याची उदाहरणे कोठे कोठे आढळतात. परंतु यावरून आपले सांप्रदायमागे चालावे म्हणून त्यांनी त्यांस उपदेश दिला असे ठरत नाही. | तुकाराम बावांनी कोणांस उपदेश दिल्याचा वृत्तांत त्यांच्या जन्मचरित्रांत किंवा त्यांच्या अभंगांच्या गाथेत सापडत नाही. हे सत्पुरुष कोणत्याही प्रकारे आप- णास अहंकाराची उपाधि होऊ नये म्हणून फार सावध असत, आणि देवाजवळ कोणांसही ही उपाधि जडू नये म्हणून प्रार्थना करीत..

  • अहंकाराचा वारा नलागो राजसा । माझ्या विष्णुदास भाविकांसीं ।

असा त्यांचा निश्चय असतां आपला सांप्रदाय मागे चालावा म्हणून त्यांनी शिष्य केले किंवा कोणांस अनुग्रह दिला असे म्हणता येत नाही, कारण एके समय छत्रपति शिवाजी महाराज यांचे शिष्य होण्याच्या इच्छेनें शरण आले अमन त्यांनी निस्पृहतेने त्यांस मी लंगोट्या, मळीन आणि कायाहीन मनुष्य आहे, मला कोणास अनुग्रह देण्याचा अधिकार नाहीं, जर तुम्हास आत्मप्राप्तीस्तव उप- देश घेणे असेल तर रामदासस्वामी अमुक ठिकाणी आहेत तेथे जावे. आणि त्यांचा अनुग्रह घ्यावा असे त्यांस पत्र लिहून पाठविले.* | आपल्या कुळांत आपला सांप्रदाय चालू रहावा अशीही तुकारामवावांची इच्छा नव्हती. छत्रपति शिवाजी महाराज स्वतः भेटीस आले तेव्हा त्यांस पुष्कळ जवा- हिराने भरलेले ताट अर्पण केले ते त्यांनी स्वीकारिलें नाही. त्यानंतर गांव जहां- गीर देऊन त्याचे तांबपट तुकारामबावांकडे पाठविले होते, तेही त्यांनी परत पाठ- विलें ; यावरून आपल्या कुळांत ही आपली शिष्यपरंपरा चालू नये असा त्यांचा अभिप्राय दिसून येतो. रामेश्वरभट्ट याने तुकारामबावांचा फार छल केल्यानंतर त्यास अनघड़शा फकी- राच्या शापाने प्राप्त झालेल्या व्यथेपासून तुकारामबावांनी मुक्त केल्यावरून तो त्यांस शरण गेला अशी कथा आहे खरी; परंतु त्यावरून तुकारामबावांनी त्यास अनुग्रह दिला आणि आपला शिष्य केला असे ठरत नाहीं, यद्यपि रामेश्वरभट्ट

  • आम्ही छापलेल्या तुकारामवावांच्या गाथेतील अभंग ६३ पासून ६३६३ पर्यंत पहावे.

» ।। ६३11 पासून ६३१७ पर्यंत. पहावे,