पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


| तुकारामवावांस महादेव, विठोबा आणि नारायण असे तीन पुत्र होते. यांशिवाय त्यांस भागूबाई नांवाची एक मुलगीही होती. याच मुलीने अनधइशा फकीराचा अभिमान (एक चिमटी भर पीठ त्याच्या कोठंब्यांत टाकून तो पिठाने भरून देऊन ) हरण केला अशी कथा आहे. या चाही मुलांनी अभंग केलेले होते. त्यांतील कांहीं अभंगांची, दाभाड्याच्या तळेगांवीं एका गृहस्थापाशी, वही होती तिजमध्ये आढळले होते, परंतु ती वही पुनः तपास करण्यास गेलो तेव्हां आमचे हाती आली नाही, परंतु दुस-या वहीमध्ये ने कांहीं अभंग आम्हांस सांपडले ते या गाथेत छापले आहेत. | तुकारामजावांचे टाळकरी होते त्यांपैकी कित्येकांनी अभंग केलेले होते परंतु ते सध्या आम्हांस आदळले नाहीत. तळेगांवकर संतानी तेली जगनाडे यांच्या अभं- गांपैकी प्राण्याचे अभंग प्रसिद्ध आहेत ते आम्ही तुकारामबावांच्या अभंगांच्या गाथेत छापले आहेत. निळोबा नामें एक पिंपळनेरकर ब्राम्हण कुळकर्णी साधु होऊन गेले; त्यांनी आपण केलेल्या अभंगांमध्ये तुकारामवावांस आपले गुरु अशी संज्ञेने स्तविले आहे. हे सत्पुरुष तुकारामवावांच्या टोळक-यां पैकी होते असे म्हणतात, निळोबांनी तुकारामवावांस केवळ परमेश्वरस्वरूप सद्गुरू मानून त्यांचे ३३३ श्लोकानें स्तवन केले आहे. हे लोक आह्मीं छापलेल्या तुकारामावांच्या गाथेच्या आरंभी छापले आहेत. यांशिवाय यांनी भक्ति, ज्ञान, वैराग्य इत्यादि विषयांवर अभंग केले आहेत, त्यांतून जे कांहीं आम्हांस सांपडले ते आम्ही या गाथेत प्रकरणाप्रमाणे छापले आहेत. या अभंगांची वाणी आणि विचार फार गंभीर आणि प्रासादिक आहे. या साधूचे चरित्र लिहिलेले कोठे आढळत नाहीं. सूचना-ज्या कोणा गृहस्थांपाशी तुकारामवावांचे बंधु कान्होबा, त्यांची मुले महादेव, विठोबा, नारायण आणि भागूबाई व टाळकरी मंडळी यांचे अभंग असतील ते त्यांनी लोकोपकारार्थ आम्हांस दिले असता आम्हीं छापून प्रसिद्ध करूं.