॥ ४९ ॥ नेणें गाऊं कांही धड बोलतो वचन । कायावाचामनेसहित
आलो शरण ॥ १ ॥ करीं अंगीकार नको मोकलू हरी । पतितपावन
श्रीदें करावीं खरीं ॥ २॥ नेणे भाक्तभाव तुझा झणवितों दास । जरी
देसी अंतर तरी लज्जा कोणास ॥ ३ ॥ ह्मणे तुकयाबंधु तुझे धरियेले
पाये । आता कोण दुजा ऐसा आह्मांसी आहे ॥ ४ ॥
| ॥ ५० ॥ तूंच मायबाप बेधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग
जीवाचा ।। १ ।। आणीक प्रमाण नाही दुसरें आतां । योगक्षेमभार तुझे
घातला माथां ॥ २ ॥ तूं च क्रियाकर्म धर्म देव तू कुळ । तूंच तप तीर्थ
ब्रत गुरु सकळ ॥ ३ ॥ अणे तुकयाबंधु करिता कार्यता देवा । तुच भाव
भक्ति पूजा पुनस्कार आघवा ॥ ४ ॥
॥ ५१ ॥ करूनी उचित । प्रेम घाल हृदयांत ॥ १॥ आल दान मागा-
यास । थोरी करूनियां आस ॥ २ ॥ चितनसमयीं । सेवा आपुलीच देई
॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे भावा । मज निरवावें देवा ॥ ४ ॥
| ॥५२॥ गाऊ चाहूं टाळी रंग नाच उदास । सांडोनी भय लज्जा
शंका आस निरास ॥ १॥ वळियाचा बळी तो कैवारी आमुचा । भक्ति-
मुक्तिदाता सकळां ही सिद्धींचा ॥ २ ॥ मारु शब्दशखबाण निःशंक
निवार । कंटकांचा चुर शिर फोडू काळाचें ॥ ३ ॥ ह्मणे तुकयाबंधु
नाही जीवाची चाड ॥ आपुलिया तेथे काय आणिकांची भीड ।। ४ ।।
| ॥ ५३ ॥ सांडूनी वैकुंठ । उभा विटेवरी नीद ॥ १ ॥ आला आला रे
जगजेठी । भक्ता पुंडलीकाचे भेटीं ॥ २॥ वैल चंद्रभागे तिरीं । कट धरू-
नियां करीं ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥ ४ ॥
॥५४॥ कृपाळू भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥ १ ॥ उभा
न पाचारितां दारीं । न सांगतां काम करी ॥ २ ॥ भाव देखोनी निर्मळ ।
रजां वोडवी कपाळ ॥ २ ॥ तुकयाबंधु ह्मणे न भजा । कां रे ऐसा भोळा
राजा ॥ ४ ॥
॥ ५५ ॥ केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करतील काळ
मशक मानव ॥ १ ॥ घातलीं बाहेर त भय होते ज्यानें । बैसला आपण
सेथे घालुनियाँ ठाणे ॥ २॥ लागों नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/56
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
