पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


निर्धार कळों आला आह्मांसी ॥ ३ ॥ काणे तुकयाबंधु न लगे करावी चिता । कोणेविशीं आतां बैसलों हस्तीवरी माथां ।। ४ ।। | ॥ ५६ ॥ अगोचरी बोलिल अज्ञेविण आगळे । परी ते आतां न संडाचे राउळे ॥ १ ॥ जाईल रोकडा बोल न पुसती आमा । तुझा तुझे ह्मणविले पाहा पुरुषोत्तमा ॥ २ ॥ न व्हावा न वजावा न कळता अन्याय । न धरावें तें मन भलता करा उपाय ।। ३ ।। ह्मणे तुकयाबंधु हीन मी ह्मणोनि लाजसी । वारा लागों पाहातोहे उच्या झाडासी ॥ ४ ॥ | ॥ ५७ ॥ उठा भागलेती जगरा । झाला स्वामी निद्रा करा ॥ १ ॥ वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारूनी ॥ २ ॥ केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥ ३ ॥ लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥ ४ ॥ आरत्या, ॥ ६८ ॥ कंसरायें गर्भवधिले सात । अणोनि गोकुलासी आले अनंत । घ्यावया अवतार झाले हेचि निमित्त । असुर संहारूनि ताराचे भक्त ॥ १ ॥ जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ ध्रु० ॥ स्थूळरूप होऊनि धरितसे सार्ने । जैसा भाव तैसा तयांकारणे ॥ दैत्यांसी भासला सिंह गजाने । काळासी महाकाळ यशोदेसी तान्हें ॥ २ ॥ अनंत वणी कोणा न कळेचि पार । सगुण की निर्गुण हा ही निर्धार ॥ पांगल साही अठरा करितां वेव्हार । तो वळितसे गौळियांचें खिल्लार ॥ ३ ।। तेइतिस कोटि तिहीं देवासी श्रेष्ठ । पाउले पाताळ नेणती स्वर्ग मुगुट । गिळिली चौदा भुवनें तरि न भरे चि पोट । तो खाउन धाला गोपाळाचें उच्छिष्ट ॥ ४ ॥ महिमा वर्णं तर पाँगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करितां स्तुती । भावें- विण कांहीं न चले चि युक्ति। राखें शरण तुकयाबंधु करी विनंती ॥५॥ | ॥ ५९॥ परमानैदा परमपुषोत्तमरामा । अच्युता अनंत इरि मेघश्यमा॥ अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥ १ ॥ जय देव जय देव जय जी श्रीपती । मंगलशुभदायका करीन