पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


॥२४॥ न मागे न मागे न मागे हरीविण । न मागे न मागे शाम कोण्हीं ने ॥ १ ॥ तळमळ करि तैसा जीव जळावीण मासा । दिसते हे तैसा दिशा कोसा वो २ ॥ नाठवे भूक ताहान विकळ झालें मन । घडि जाये प्राण युगा एकी वो ॥ ३ ॥ जरी तुह्मी नोळखा सांगतों आयिका । तुकयाबंधुची सखी जगजीवन ॥ ४ ॥ | ॥ २५ ॥ देखिला माय भीमातिरीं । कर मिरविले कटावरी ॥ पाउले समचरण साजिरी । नाम अनंत अति गोड ॥ १ ॥ शंख चक्रांकित भूषणें । जडित मेखला चिद्रत्नें ॥ पीतांवर उटी शोभे सांवळेपणें । लोपली तेणें रावतेजें ।। ३ ॥ श्रवण कुंडलें देतीं टाळ । दशांगुळीं मुद्रिकामाळ ॥ दंतपंक्ति हिरे झळाळ । मुख निर्मळ सुस्वराशी ॥ ३ ॥ कट कर दोन्ही वांकी वेळा । बाहि बाहेवटी पदक गळां ।। मृगनाभीचा रेखी टिळा । लवती डोळां विद्युलता ।। ४ ।। ऐशी सुंदरपणाची साम्यता । काय वर्णं ते मी आतां ॥ तुकयाबंधु ह्मणे अच्युता । प्रमविली माता पिता ते धन्य ॥ ५ ॥ ॥ २६ ॥ हम उदाम तीन्हके मुनाहो लोकां । रावन मार विभीषण दिई लंका ॥ १ ॥ गोवरधन नखपर गोकुल रावा । बर्सन लागा जब में हो फत्तरका ॥२॥ बैकुंठनायक काल कौंसासुरका । दैय डुबाय सब मंगाय गोपिका ॥ ३ ॥ स्तंभ फोड पेट चिरीया कश्यपका । प्रल्हादके लिये कहे भाई तुकयाका ॥ ४ ॥ | ॥ २७ ॥ चुराचुराकर माखन खाया । गौलनीका नंद कुमर कन्या ॥ १ ॥ काहे बराई दिखावत मोहि । जानतहुं प्रभुपना तेरा सवाहि ।। २ ।। और बात सुन उखलनुं गला । बांध लिया अपना तू गोपाला ॥३।। फेरत अनबन गाऊ धरावत । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात । ४ ।। | ॥ २८ ॥ आकारवंत मूती । जेव्हा देखेन मी दृष्टी ॥ १ ॥ मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथे चित्त ॥२॥ श्रुति वाखाणिती । तैसा येसील प्रचिती ॥ ३ ॥ ह्मणे तुकयाचा सेवक । उभा देखेन मन्मुख ॥ ४ ॥ | ।। २९ ॥ कोठे गुंतलासी द्वारकेच्याराया । वेळ कां सखया लाव- येला ॥ १ ॥ दिनानाथ श्रीद सांभाळी आपुलें । नको पाहों केलें पाप- पुण्य ॥ २॥ पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे दौपदीचा धावा । केला तैसा मला पावे आतां ॥ ४ ॥