॥ ३ ॥ विठ्ठला रे तुझी ऐकतां कीर्ति । विठ्ठल हे तिश्रांति पावले स्मरणें
॥ ४ ॥ विठ्ठला रे तुकयाबंधु अणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाच धरितां
मेला ॥ ५ ॥
| ॥ १८॥ बरवा बरवा वरवा रे देवा तूं । जीवाहूनि आवडसी जीचा
रे देवा तूं ॥ १ ॥ पाहतां वदन संतुष्ट लोचन । झाले आइकतां गुण श्रवण
रे देवा ॥ २ ॥ अष्ट अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वणितां लक्षण रे
देवा ३ ॥ मन झालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु ह्मणे महिमा नेणें
रे ॥ ४ ॥
॥ १९ ॥ व्यापिले सर्वत्र 1 बाहेरी भीतरी अंतर ॥ १ ॥ ऐसें गोविंदै
गोविलें । बोलें नवजाये बोलिलें ॥ २ ॥ संचिताची होळीं । करून
जीव घेतला बळी ॥ ३॥ तुकयाबंधु ह्मणे नाहीं । आतां संसार उरी
कांहीं ॥ ४ ॥
॥ २० ॥ तुह्मा आह्मांसी दरुपण | झालें दुर्लभ भाषण ॥ १ ॥ ह्मण-
अनि करित आतां । दंडवत घ्या समस्तां ॥ २॥ भविष्याचे माथां देह ।
कोण जाणे होईल काय ॥ ३ ॥ ह्मणे तुकयाचा बांधव । आमचा तो
झाला भाव ॥ ४ ॥
॥ २१ ॥ अनंतजन्में जरी केल्या तपरासी । तरी हा न पचसी काणे
देह ॥ १ ॥ ऐसें जें निधान लागलेंसे हातीं । त्याची केली भाती भाग्य-
हीना ॥ २॥ उत्तमाचें सार वेदाचे भांडार । ज्याच्याने पवित्र तीर्थे होती
॥ ३ ॥ ह्मणे तुकयाबंधु आणीक उपमह । नाहीं या तों जन्मा यात्र-
यासी ॥ ४ ॥
॥ २२ ॥ चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥ १ ॥ नलगे
गोड कांहीं अतां । आणीक दुसरे सर्वथा ॥ २ ॥ हरपला द्वैतभाव । तेणें
देह झाला वाच ॥ ३ ॥ तुकयाबंधु काणे आह्मी । झालों निष्काम ये
कामीं ॥ ४ ॥
॥ २३ ॥ काय करूं ये लाजा । दुमा पुरावला माझा ॥ १ ॥ नेदी
आठवू तुजला । आड येते बोला बोला ॥ २॥ शब्द कादी काढी । तो है।
उभीच धगडी ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे देवा । इचा पार न देखावा ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/47
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
