पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( 4 ) सत्यभामा देवास लावून बोलली ते अभंग. ॥ ३० ॥ करूनी आइत सयभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनी गेली रात्री रे ॥ न येचि देव येती कामलहरी रे । पहिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी रे ॥ १ ॥ सर गा परता कळला तुझा भाव रे । कार्या पुरते हैं दाविसी लाघव रे ।। बोलतोसी ते अवघी तुझी माव रे । जाणोनी आलासी उजडता समयो रे ॥२॥ मीच वेडी तुजला बोल नाहीं रे । दाना- वेळे विटंबना झाली काय रे ॥ मागुती रुद्रासी भेट दिली तई रे । विश्वा- साते तुझ्या बोला अझुनी तरी रे ॥ ३ ॥ भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होते मी भला भला रे । नष्ट क्रिया नाही मी तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडया कौसल्या रे ॥ ४ ॥ | ॥ ३१ ॥ तंव तो हरि ह्मणे वो निजांगने धो । लाइ नीच कां देसी डोहणे वो ॥ मजपें दुजें आले ते देव जाणे वो । शब्द काय बोलसी ते उणे वो ॥ १ ॥ पाहा मनीं विचारूनी आधीं वो । सांडुनि देई भ्रांति करी स्थिर बुद्धि वो ॥ तंट केले हे माझे तुझे उपाधीं वो । उघडी डोळे अझनी तरी धरी शुद्धि वो ॥ २॥ कोठे तरी दुनियांत वर्तलें वो । स्त्रियांनी भ्रतारा दाना दिले वो ॥ कैसा भला मी नव्हे ते सोसिलें वो । रुसतेसी तुं उफराटें नवल जालें वो ॥ ३ ॥ काय सांग म्यां दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्दै आणविलें हनुमंतासी वो ॥ कष्टी केलें मज गरुडा भीमकासी वो । तुकयाबंधु मणे खरे खोटे नव्हे यासी वो ॥ ४ ॥ | ॥ ३२ ॥ तंव ते ह्मणे ऐका हृषीकेशी वो । नावाजलें तुह्मी ह्मणी आपणांसी वो ॥ तरी कां वंचनुक सुमनासी वो । नट नाट्य बरें संपादं जाणतोसी वो ॥१॥ सर हो परत परता हों आतां हरी । ह्मणे सत्राजि- ताची कुमरी ॥ जाणते मी या शब्दाच्या कुसरी । ऐसेच करून ठकविले आजीवरी ॥ २ ॥ भावें गेलें म्हणून व्हावा वियोग । मनींची आर्त जन्मां- तरी व्हावा संग ॥ तों तों केलें हें पाठमोरे जग । ऐसे काय जाणे हे तुझे रंग ॥ ३ ॥ काय करू गा नागविलें कामें । लागले तयास्तव इतुकें सोसावें । नाहीं तरी कां नहीं ठाव वर्मं । परद्वारीं ऐसा हाकलिती प्रसिद्ध नांवें ॥ ४ ॥ काय किती सांगावें तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठुर