पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुकारामबावांच्या शिष्यांच्या अभंगांची गाथा. .:.

--

- तुकयाबंधु कान्होबा यांचे अभंग. स्फुट अभंग. ॥ १ ॥ काम क्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लल्ला चिंता कांहीं ॥ वास पंढरीचा सदा देई । आणीक दुजें मागणें तुज नाहीं ॥ १ ॥ देई दान हरि मज कृपा देई दान । नासी तिमिरं दाखवीं चरण } आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षु आलिया शरण ॥ २॥ नाम अखंड हदयी राहो वाणी । न पडी विसर क्षण जागृति स्वप्नीं ।। संतस- मागम ऐसा दे लावुनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥ ३ ॥ पंथ- पुरिचा रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता । नाहीं आडताळा त्रैलोक्योमाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरण ठेवूनि माथा | ॥ २ ॥ तटाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लाहान नेणे ॥ १ ॥ परी या विशेष मनुष्य होऊनि । करी खंड मान वडिलांचा ॥ २॥ वेरसा गाढव माय ना वहीण | भुंके चवीविण भलतेंचि ॥३॥ तुकयाबंधु ह्मणे बोकड मातले। विचारी आपुले तोंडी मुते ॥ ४ ॥ ॥ ३ ॥ मायझवी खेर गाढवाचें बीज । तें ऐसे सहज कळ येतें ।। १ ।। अपमानिले जेणे श्रेष्ठाचे वचन । तेचि याची खुण ओळखावी ॥ २ ॥ मद्यपी तो पुरा अधम यातीचा । तया उपदेशाचा राग वांया ॥ ३ ॥ तुक- याबंधु ह्मणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचाराचें ॥ ४ ॥