पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २ ) ॥ ४ ॥ मत्स्यकूमशेष कोणाचा आधार । पृथिवीचा भार वाहावया ॥ १ ॥ काय धाक आह्मां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ २॥ शंख चक्र गदा आयुधे अपार । वागवितो भार भक्तांसाठीं ॥ ३ ॥ पांडवां जोहरी राखिले कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥ ४ ॥ | ॥६॥ राम ह्मणतां कामक्रोधांचे दहन। होय अभिमान देशधडी ॥१॥ राम पणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम शीण स्वप्नास ही ॥ ३ ॥ राम अणतां जन्म नाहीं गर्भवाम् । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥ ३ ॥ राम अणतां यम शरणागत बापुडें । अढळपद पुढे काय तेथें ॥ ४ ॥ राम पणतां धर्म घडती सकल । तिमिरपडळ नासे हेला ॥ ५॥ राम ह्मणतां सणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥ ६ ॥ ॥ ६ ॥ मरोनि जाईन गुणनामावरूनि ! तुझ्या चक्रपाणी मायबापा 1॥ १ ॥ चुकविली दुःखें मायेला वोळसा । तोडोनियां अशापाश तेणें ॥ २॥ केली काया तनु हिंसी शीतळ । चिंता तळमळ नाहीं ऐसी ॥ ३ ॥ काळे तोंड काळ करूनि राहिले । भूतमात्र झाले सज़नसखे ॥ ४ ॥ तुकया- बंधु अणे अवघ्या दश दिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥ ६ ॥ | ॥ ७ ॥ आतां मागतो ते ऐक नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां ॥ १ ॥ असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाक परती ॥ २ ॥ मातेचिया परी देखती परनारी । ठेवीं नेत्र तरी नाहीं तरि नको ॥ ३ ॥ तरी बरें कांटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तर कानांचा ही देख प्रेत्न ॥ ४ ॥ सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि एक । राखावीं पृथक तोडोनि भ्रम ॥ ५॥ तुकयाबंधु ह्मणे तेचि वाट प्राणां । पडतां नारायणा विसर तुझा ॥ ६ ॥ ॥ ८॥ नमस्कारी भूते विसरोनि याती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥ १ ॥ परउपकारी वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥ २ ॥ द्वैताद्वैतभाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥ ३॥ जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥ ४ ॥ उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ति मानव तो ॥ ५ ॥ तुकयाबंधु पणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥ ६ ॥ | ॥ ९॥ चवदा भुवनें लोक तिन्हीं दादे जो कवळी । संपुष्ट तो संबळी- मध्ये देखा ॥ १ ॥ उत्पत्ति संहार करिता जो पाळण । तो नंदा नंदन सण-