। '४५५ )
पडते वो दाखवा मज वाट । कर्माकम चुकवुनियां घाट॥ कामक्रोधाचे ऐकोनि
चोभाट । भय वाटेने में देखोनि दुर्घट वो ॥ २॥ मज तो विचार न मुचे आपुल्या
मते । न्याल तुह्मी या येईन सुपंथें । घेउन धर्म मज पाचवा वो तेथे ।
जेथे असतीं सांवळे गोपीनाथ वो ॥ ३॥ कोठे गेले या करू चोरवार ।
आग लागो या अधारा संसारा }} पडते गुंत हा अधिक चि पसारा ।
भेटवा आतां मजे न्या वो सारंगधरा ॥ ४ ॥ येथे होती हे वहुत चि
उत्पात । जन्म जरा या व्याधीचे आघात ॥ भुलले वाट वो न मिळत
संघात । तुह्मि पावा वो रमानाथ जेथे वो ॥ ५ ॥ आहे भरंवसा है।
तुमचा चि मज । संत जाणतसां अंतरीचें गुज ॥ आले शरण ते पावती
सहजे । निळा ह्मणे आतां राखा माझी लाजे वो ॥ ६ ॥
| ॥ १५४१ ॥ वदन निमासुरे कडावरी करे । उभा वटेवरी पुंडलीका
समोर ॥ चरणी ब्रीदाबळी रुळती अगुर । वरी बाळे वाकी रुणझुणित
मधुर वो ॥ १ ॥ तेणें नवल चि केलें वो साजणी । सहज अवलोकितां
संचरला नयनीं ।। त्याविण न दिसे चि दुजें जनीं बनीं । जें जें दिसे तें तें
हा चि भासे मानं वो ॥ २ ॥ कांसे कसिला चो मिरवे सोनसळा । कट
कटिमूत्र जडित मेखळा ।। उदरीं त्रिवळी वो तुळसी वनमाळा । कौस्तुभ
पदकै द्विजचरणांकुश सोज्वळा ॥ ३ ॥ मुखमयंक पूर्ण उगवला ।
भक्तचकोरासी अमृतें वरुपला ॥ दंत हिन्याचा प्रकाश फांकला । आधार
सोज्वळ वो नासाग्र सरळा वो ॥ ४ ॥ निहळि रेरिखले वो केशर झुळके ।
श्रवण कुंडलांचें तेज बद्दळ फांके ॥ नयनीं सुतेज विद्युछना चमके ।
माथां मुगुटावरी मयूपिच्छ स्तवकें वो ॥ ५ ॥ सुंदर साजिरे व स्वरूप
ठाण माण । तेणें आकापले माझे पंचप्राण ॥ नावडे आणिक वो याचि
चि मज आण । निळा झणे मी माझी याचि झाली बोळवण वो ॥ ६ ॥
| ॥ १५४२ ॥ मी मज माझी याचा तुटला संबंध । ऐसा लाविला वो
येणे मज वेध ॥ जीव जीवाचा हा मोडल कंद । नुरे देहभाव ऐसा केला
बोध वो ॥ १।। सखिये साजणी ऐके माझे गुज । यासी पाहतां वो
बोलतां सहन ॥ नेलें इरूनियां अंतरीचें निज । पुढे नाचवी हा आपुलें चि
भोज वो ॥ २ ॥ करितां काम धाम विसरांच पडे । ध्यानीं आए। वो
याचे चि रुमडे ॥ रारे वेटुनियां हाचि मागे पुढे । या विण न दिसे चि
केलें मज वेडे वो ॥ ३॥ करितां भोजन वो निजतां शयनीं । जागृती
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/383
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
