सरले समस्त । गेलें उडोनियां मालब्ध संचित ॥ विटले विपया वरुनियां
चित्त । निळा ह्मणे घडला हरिशीं एकांत वो ॥ ६ ॥
| ॥ १५३८ ॥ माझे मजाच वो आतुहले गुज । नाहीं आणिकाचे कामा
आलें काज । साहिली लौकिकाची बरे झाले लाज । तेणे लाधलीये
निजाचें ही निज च ।। १ ।। पहिली गांठीं या गुणा सर्वे । एकनिष्ठ वो
शरण जातां भावें ॥ मनींचें राखतां वो आर्त नित्य नवें । झाला प्रसन्न हा
देवाचाही देव वो ॥ २॥ याचिलागि म्या सोशिले गर्भवास । घेतले
जन्म बो याचीच केली आस । नाहीं देखिले वो कोणाचे गुण दोप ।
ह्मणोनि कृपावंत झाला हा परेश वो ॥ ३ ॥ जें जें अर्चिलें तें सुकृत
याचि साठीं । नाहीं वेनिलें वो जतन केलें गांठ ॥ भोग त्यागीं वो
याचि वरि दोठी । ह्मणोनि आज हा बाध जगजेठी वो ! ४ ॥ धरिले
जन्म ते सार्थक झाले माय । भेटनुनी याशीं वो फलले उपाय ॥ चुकले
अवघेचि आघात अपाय । ह्मणोनि आलिंगन देति यादव या वो ॥ ५ ॥
केळे ब्रीद वो साच येणे कालें। अनाथवंधु हैं दीनाच्या दयाळे ॥ केली
कृपा वो पुरविले भोइळे । ह्मणोनि निळा नित्य चरणावरी लोळे वो ॥ ६ ॥
| ॥ १६३९ ॥ ये एकलें वो जाणें ही शेवटीं । येथे राहाणेचि नाहीं
कल्पकोटी । जोडिलें धन तें न चले लक्ष कोटी । ह्मणोनि आलियें या
सांवलियाचे भेटी वो ॥ १ ॥ आतां घाला वो याच्या पायां वरी । हाचि
चुकवील जन्माचि भोवरी ॥ शिणलें बहुत वो चौ-याशीचे फेरी । तोडील
चिंता हा हे चि अशा थोरी वो ॥ २॥ बभुत गांजियेलें माया मोह भ्रमें
रततां विषयीं या विषयाच्या कामें । करितां भरोघरी रित्या मनोधर्मे ।
याशी कृपा येतां इरील हा कमें वो ॥ ३ ॥ कामक्रोध को जांचिलें चहुत ।
नेदी रा वो क्षण एक निवांत ॥ वरी पडती वो गर्वाचे आघात।
मणोनि विनवणा सांगा वो त्वरित वो ॥ ४ ॥ अशा कल्पना या
मातल्या पापिणी । मनसा चिंता हेरिखती सपिणी ॥ येती लहरे वो
जाणिवेची जाचणी । ह्मणोनि विनविते हे चि क्षणक्षणीं वो ॥ ५ ॥ अहे।
शेवटचे माझे येथे घेणें । वाटे निश्चय ही याचिया दर्शने ॥ राहिले चित्त
वो याचेंचि चितन । निळा ह्मणे आजि ऐकिलें गान्हाणे वो ॥ ६ ॥ ।
॥ १५४० ॥ काय करूं वो भुलविले मुली । चित्त माथें या विषयाचे चाली।
आडकल्पना ठाकोनि राहिली। खाणे संगति बो याची अंतरली वो॥१॥पायां
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/382
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
