पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२९ ) जीवनाते दो ॥ ४ ॥ निळा ह्मणे तया हरिच सांगाती । सा हि वर्तताति हरिच्या अनुवृत्ती । नाहीं उरविली दोनिपणे खेती । वसति एकएक निजा- त्मता युक्ती वो ॥ ५ ॥ ॥ १४८९ ॥ मी मन माझे याची केली वो निरम । वीण आपणा येणें अणियेला त्रास ।। नेदीं आड येऊ दुजियाचा आभास। कैसे काय करुं सांगा मज यस वो ॥ १ ॥ ऐसें नाजायोनि वाले एक नारी । हरिचा सुखानंद भरुनी अंतरीं ॥ लटिकाचि वालभाचा भाव लोकाचारी । दाउनि एकांती इरिसी काम सार वः ॥ २ ॥ ह्मणे वृत्ती माझी नुरेदेहावरी ।। क्षण हि न कंठे वो सासुरामाहेरी । काय करू मी वो नगमे घरदारीं । नेऊनी घाला जेथे अनंग मुरारी वो ॥ ३ ॥ यावरी गेलें आतां माझे माणुसपण । करितां उपचार ते हरिती माझे प्राण ॥ गेले होऊनियां होते ते निर्माण । सोडा अस माझी द्या व मोकलुन वो ॥ ४ ॥ ऐसि देहगेही होऊनि उदास । गेले तुटोनियां अवघे अशापाश ।। निद्रा जागृति ना स्वप्नाचा अभास । एक लागला त्या हरिचा निजध्यास वा ॥ ५॥ निळा झण्डे नेणे आपपर दुसरे ॥ भरली निजानंद न पाहे माघारें ॥ कैचें येईल तेथे अविद्येचे वारें ॥ झाले हृदय स्वानुभव चईरे वो ॥ ६ ॥ ॥ १४९० ॥ नव्हतें एक ना दुसरे कांहीं यासीं होता । लपोनियां आपलीये कुसी । कांहीं चि नोळखोनि आप अपणासी । तोचि येउनि येथे झाला आविनाशी बो ॥ १ ॥ रूप धरिलें सगुण चांगलें । बाण माण जेथलि तेथेची रेखीखें ।। चतुर्भुज शंखचक्रातें मिरवले । मुगुट माला श्रवणी मुतेज कुंडलें वो ॥ २॥ नव्हता गांव सीव पहिले यामि कांहीं । नामरूपासि तो आधी चि ठावानाहीं ॥ ह्मणति वैकुंठ ते कालिची झाले वाई । क्षीरसागर ना कैचि शेपशाई वो ॥ ३ ॥ नव्हता काळा गोरा खुजा ना ठेंगणा | स्वरूपसुंदर ना आंधळा देखणा ।। केचि जीव शिव तयासी भावना। पंचभौतिक ना नेणे पंचप्राणा वो ॥ ४ ॥ नव्हता मन बुद्धि इंद्रि- यांचा मेळा । कार्य कर्तृत्व हा करणावेगळा ॥ येणे जाणें यासि नव्हते कवण्या काळा । तोचि आला या नंदाच्या राउळा वो ॥ ५॥ यासि जीवें भावें धरा घाला मिठ्या । ऐशा वोलती गौळणी गोरटया । निळा ह्मणे अवघ्या मिळोनि लहान मोठया । यासि चुकाते त्या अशाग्या करंट्यायो॥६॥


- -