( ३३० )
खेळ मुलांचे.
॥ १४२५ ॥ आंगा आणुनि चारें पारा घालिसि इमामा । निधानियां
जाईल पुढे पडसि येउनि दमा ।। १ ।। घुमे एक्याभावें । हा गोपाळ घेउनि
सर्वे ।। २ ॥ तोंडा येतो फेस पुटिला नाचसिल वारे । पडतां निसतेाश मग
हांसतिल पोरें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सकळ ही सोडुनियां तमा । एका हरि-
विण तया नांव इमाम ॥ ४ ॥
| ॥ १४९२ ॥ धरुनि हात हात पोरी घरिसी चिकाटी । नमुटेसि मग
वलिया सांपडतां मुष्टी ॥ १ ॥ धरिसी तरी धरि एक हरि चित्तीं मनीं ।
नाहितरि अहंकार गोविल व्यसनी ॥ २॥ सोडवितां न सुटे या नाडिवो
अभीमाना । वायां व्यर्थ कॅथोनियां पड़ासले पतना ॥ ३ ॥ निळा म्हणे
अंतरिचे जाणे हरि सर्व । तया हातीं हात देतां देईल तो वैभव ॥ ४ ॥
॥ १४९३ ॥ तारुण्याच्या वळे घेऊं धांवसिल झवी । पडलिया तळीं
हासों लागतिळ उभी ॥ १ ॥ घेसी तरी घेई हरिस घालि मिठी । नेदी
पडो तोचि वंद्य करिल येसृष्टी । २ ॥ एकाहुनि बळि येक नये तुझ्या
भ्याना । कुंथेनिया येसी तळा होईल तनाना ॥ ३ ॥ निळा ह्मणे झवि
लव घेई काळासवें । श्रीहरिच्या बळे मग वाटशिल नांवें ॥ ४ ॥
| ॥ १४९४ ॥ लैस वेलि देता सेलि होसि कासाविस । येईल पुढे थेटे
पडसे आयुष्याचा नाश ।। १ वुड हरि सर्वे । देह भाव उरनिभावें ॥ २ ॥
दरडिवरी राहोनि उभा मारिसी कीराणे । तळिचा धोंडा नेणोनि पारो
जाशिल जिवे प्राणें ॥ ३ ॥ ह्मणे निळा सांडुनि खेळा श्रीहरितें भज ।
अक्षोभ जळे नचले वळ होशिल निर्बुज ॥ ४ ॥
॥ १४९५॥ सुरकाडि बैसोनि खोडि चदसि झाडावरी । मोडलिया
डाहाळी खांद पडशील आघोरी ॥ १।। वेंघ ऐशावरी घेउनि सर्वे हार॥ २ ॥
जगडवाळ झाडे वरि खांद्याहि वांकुड्या । उलंडल्या वरुनि हुन रोडतिले
मांड्या ॥ ३ ॥ निळ, ह्मणे श्रीहरि तें दृष्टि धरुनियां । वेंधेवर जाई दुरि ने
पवसि अपाया ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/371
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
