पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/359

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( ३१८ ) वर्ण ॥ ८९ ॥ झोळ्या बटवे कक्षेमाजी जड्या बुट्या । आडवंद लंगोट्या बटुवखें ॥ ९० । कुबड्या काठ्या छड्या वेणुदंड हातीं । टोप विराजती कफणीया ॥ ९१. ॥ कुंडलें सांगातें भांग घोटावया । चिलमी ओढावया गुडगुड्या ॥ ९२ } पक्ष्यांचे पिंजरे सांगातें कुतरे । चितळे सामरे सोकवीलीं ॥ ९३ ॥ पांवे मोहया चंग किन्नरी झल्लरी । डफ हुडुक करीं नागसरे ॥ ९४ ॥ गोरख धंदे हात गोळाणे धनुष्ये । धावती आवेशे विद्येचिया ॥९५॥ कूशळ कवी ते वाचाळ बोलते । वहुमतें झकविते तर्कवादी ।। ९६॥ फळे जळाहारी येक दुग्ध पीती । मौन्याचे व्रतस्थि पवनाभ्यासी ॥ ९ ॥ व्याघ्रारोहणे रथाची बहनें । मर्याची वेष्टणे नानाविध ॥ १८ ॥ योग मुद्रा अंगीं दावीती कटी। नानालक्ष्य दृष्टी उफराटीया ॥ ९९ ॥ कलर वापरी आंजने घालून नयनीं । दाविती लोचनीं तिमिर तेज ॥ १०० ॥ भावीका नरनारी वाळा झुकवीती । हेंचि ब्रह्म ह्मणती तेजाकार ॥ १ ॥ सवाचा दुष्काळ असयाच रूढी । दावितात प्रौदी थोरपणा ॥२॥ मागचे जनलोक सामोरे धांवती । लोटांगणी येत चांगदेवा ॥ ३॥ नानावस्त्रे भेदी सिद्ध सामग्रिया । समर्पूनि पाया नमस्कारिती ॥ ४ ॥ याचेनि दर्शने जडजीवा उद्धार । करिती जयजयकार नामघोपें ॥ ५ ॥ आलें पुण्य स्तंभा श्रीगोदे सन्निध । केला तीर्थविधी स्नान संध्या ।। ६ ।। द्विजसंतपणे वाटीयेलीं दानें । पुढारी गमनें आरंभीलीं ॥ ७ ॥ आले खिंडीवरुनी चालीयेले भार। केले नमस्कार मैसीपुत्रा ॥८॥केंदुरा वरुनि उतरले घाटा । गर्जती उद्भट सिद्धनामें ॥ ९ ॥ कान्होपाठक प्रीती चालविलेसवें । प्रार्थनी चांगदेवें अत्यादरें ॥ १० ॥ आले भीमातीरीं स्नानीं स्थिरावले । पुढे पाठवीलें सांगोनियां ॥ १५ ॥ यावरी ह्मणे निळा होईल सिद्धभेटी । परस्प- ३ ते गोमटी आहे कथा ॥१२॥ बहुत आपूर्व आसुमाई चरित्र । परिसोत सर्वत्र श्रोतेजन ॥ १३ ॥ इती श्रीचांगदेवचारत्रे सिद्धदर्शनंनाम चतुर्थ प्रकरणे ॥ ५९६ ॥ श्रीज्ञानदेव, ॥१४७७॥ चालीले ब्राह्मण वार्ता सांगावया । शीघ्र बैसोनियां व्याघावरी