पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/350

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( ३०९ ) देखोनि आश्चर्य येरे येरा दाविती । आसुमाई में म्हणती नवल- थोर ॥ ४१ ।। बोलील्या सारखी कतृत्वाची शक्ती । आंगीं तेची विभुती ईश्वराची ॥ ४२ ॥ उदउँ बोलती हावभाव दाविती । परी ते प्रतिष्ठाचा मिरवीत ॥ ४३ ॥ आजी हे अपूर्व देखीलें लोचनीं । परदुःख लेउनी दाविलें आंगीं ॥ ४४ ॥ कुटील म्हणती सर्व बाजीगीरी । दावि- ताती परी विद्याचिया ॥ ४५ ॥ गौडबंगालीची विद्या हे प्रसिद्ध । शिकवूनी प्रबुद्ध केलीं पोरें ॥ ४६ ॥ चतुर्थाश्रमांत करितां तीर्थाटणें । शिकला टाणे टोणे क्रियाभ्रष्ट । ४७ ॥ पतीत मन्यासी पतिताचे मंत्र । पढविले अपवित्र अर्भकांसी ॥ ४८ ।। सर्वा विशि तेणें नाश केला थांचा । जें प्रायश्चित्त वाचा नवदे श्रुती ॥ ४० ॥ गुरु आज्ञेवरी होऊनी सकाळ । लावीयेला बीटाल चतुर्थाश्रमा ॥ ५० ॥ अभिचार पूजा कापट्याची बीजें । धोकवीलीं वोजें मूर्खापोरां ॥ ५५ ॥ अर्भकांसी थार नाहीं ऐसी केलीं । उभय कुळे नेलीं पतनद्रारा ॥ ५२ ॥ सात्विक प्रबुद्ध वोलती तयासी । नये गुणदोषी चित्त ३ॐ ॥ ५३ ।। दिक्षादानी ऐसे भासती लोचनीं । पैशुन्य वचनी काय काज ॥ ५४ ।। न कळेची महिमा कदाहि कोणाचा । नये बोलों वाचा हेळमुनी ॥ ५५ ॥ जानकी स्वयंवरी राम बाळरूप । भंगूनीयां चाप पशिली सीता ! ५६ ॥ वटरुपी वामन तीन पादभूमी । मागोनी आक्रमी अवनी मर्व ॥ ५५ ॥ तैमाची प्रल्हाद दैयचीये वंशीं । झाला वैष्णवाशी अग्रगण ।। ५८ ॥ मर्कट योनीसी जन्मला हनुमंत । प्रताप अद्भुत आंगीं याचे ॥६९. ॥ घटामाजी जन्म पाशीला सागर । पाहा द्विजवर अगस्ती मुनी ।। ६० ॥ हे न झाके सुवर्ण कमवटी लावितां । भानू आछादितां अभ्रछाये ॥ ३५ ॥ याहिरी यासी युक्ति एकी आहे । जेणे निःसंदेह फिटे भ्रांती ।। ६२ ॥ जरी बोल- वील पशु निजसुखें । तरी याचे श्रुतीकें आत्मज्ञान ॥ ६३ ॥ तरी मानू म्हैसा याचा आत्मा खरा । कई परीहारा दोषमुक्त ॥ ६४ ।। ऐकोनीया सकळ मानवले द्वीज । म्हणती हेची वोज बरवी युक्ती ॥ ॥ ६५ ॥ येरहवीं पद्धती नाहीं ग्रंथांतरीं । प्रायश्चिता वरी वचन याच्या ॥ ६६ ।। यती धर्मामाजी पत्नी अपंगीली । नाहीं हे ऐकीली शिष्टा- चारीं ॥ ६७ ॥ कैंचे प्रायश्चित्त श्रीपादाच्या पोरा । कीजे परीहारा दंडुनि दोषां ॥ ६८ ॥ 'नकरवे सर्वथा याचा अंगीकार । बरवा ही विचार काहीयेला ॥ ३९ ॥ वरी ह्मणेनिळा पुढीलीये प्रकर्णी । वेद घोर्षे