पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लीया पत्र हांसती सकळ । म्हणती याती कुळ नाहीं यांसीं ॥ १२ ॥ नव्हतें जें ऐकिलें तें नेत्र देखिलें । अपूर्व ही मुले श्रीपादाचीं ॥ १३ ॥ चतुर्थाश्रम आणि भार्येसी संबंध । ऐकतां हें निषिद्ध घडती दोष ॥ १४ ॥ ठेवीयेलीं नांवें बरवीं विचारुनी । केलीं उपजवोनि पतित पोरें ॥ १६ ॥ ज्ञानदेवो अर्थे ज्ञानाचा दींवम । हा तो पतित वैष बालकाचा ॥ १६ ॥ ईतिचये पोटी जन्मले पतीत । नामें विपरीत ठेवीयेलीं ।} १७ ॥ जेवि छत्रपती म्हणती घरींच्या वाळका । परी कैंचा गज सिक्का राज्य त्यासी ॥ १८ ॥ निवृत्ति हैं नाम प्रवृत्ति बांधला । सोपान अवघडला प्रत्यवायीं ॥ १९ ॥ मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी । ज्ञानदेव आणि पातित्य भौगी ॥ २० ॥ तंच एक म्हणती होता नामापासी काय । राजा आणि वाहे मोळ्या शिरीं ॥ २१ ॥ रवीं नाम आण्णी दधी मंथन करीत । फणी विचरीत वनिता केश ॥ २२ ॥ इंद्रधनुष्य आणि क्षणमात्रेची वीरे । मेरू आणि फीरे माळेसवें ॥ २३ ॥ पैल तो गे म्हैसा पखाले वाहती । आणि ग्याना त्या म्हणती विश्वजन ॥ २४ ॥ म्हैमीपुत्र आणि नामें म्हणत ग्याना । तरी काय तो होईल प्रज्ञाशीळ ॥ २५ ॥ ऐकोनि ज्ञानदेव बोलती तयासी । होती ज्ञानरासी आत्मा माझा ॥ २६ ॥ अज्ञानासी उचिो नाहीच पाहतां । विचारावे अतां देईल साक्ष ॥ २७ ॥ म्हणती द्वीज हे पूर्णाची बोलणी । बोलती बायाणी मुखें पोरें ।। २८ ॥ उपवासी उद्गार देती धाल्या ऐसे । परि ते फोस जैसे भुकेल्याचें ॥ २९ ॥ श्रीपाद वोलतां ऐकीली जी वचने । तेची धरुनि मनें वैसलीं है ॥ ३० ॥ कुपथ्य हैं यासी झालें सर्वापार । प्रायश्चित्तावरी पडिला धोंडा ।। ३१ । वासुदेव सर्वा भूती है वोलती । परी बहुत जन्माते प्रतीती ज्ञाननिष्ठे ॥ ३२ ॥ शुका सनकादिकाचे हे स्वानुभव । पावती मानव कैशापार ॥ ३३ ॥ शब्दज्ञानी सर्वही कथनी हेची कथिती । परी तैशा नपवती स्वानुभ्वा ॥ ३४ ॥ ऐशा करूनिया खीझ्या धिःकारें बोलती । नाश केला म्हणती वृथा ज्ञानें ॥ ३५ ॥ पुसायासी कैसा तुझा आत्मा पशु । हा दावी सौरभु बोलील्याचा ॥ ३६ ॥ त्याचया तोडणे तुज येती वेदना । की पावसी घातना त्याच्या घातें ॥३७॥ दावी चमत्कार तरी ज्ञानेश्वर । ऐसें द्विजवर बोलीयेले ॥ ३८ ॥ म्हणती ज्ञानदेव मैदेह निरसावी । म्हैसी अणवावा जवळीके ।। ३९ ॥ मग अणुनी टोणगा मारीती सिपुटी । तंव तोची उठी ज्ञानदेवा ॥ ४० ॥