पूर्वाचिता नचले कांहीं ॥ ८१ ॥ जीता आन तुज देऊ चीरचौळी । तूची
आमुचे कूळी कन्यापुत्र ॥ ८२ ॥ यावरी तुळसीवृंदावनीं पूजने । करूनि
प्रदक्षिणा सारी काळ ॥ ८३ ॥ मम तचि दृढ व्रत धरीयेलें रुक्माई । नेणे
दुजें कांहीं मेवेवीण ॥ ८४ ॥ तंव नृसिंहाश्रमासी निजस्वप्नीं दृष्टांत । झाला
अकस्मात महाक्षेत्रीं ॥ ८ ॥ चैतन्याश्रमामी आहे भार्या घरीं । पतिव्रता
माहे मार्ग लक्षी ॥ ८६ ॥ तरी तुह्मी जाऊनियां आणावी ते येथे । आणी
द्यावें सन्यास्याते तिचिये हातीं ॥ ८७ । उभयतां एकत्र नांदवावी ऐक्यें ।
जंत्र होती बालकें चौघे पोटीं ।। ८८॥ इंद्रायणीतीरीं आहे ते सुंदरी । माजी
आलंकापुरा पतिव्रता ॥ ८९ ॥ तरी तुह्मी अनुमान नकारतां यदर्थी । जावें
शीघ्रगती आणावी ते ॥ २० ॥ मग नृसिहाश्रम आले आळंकापुरासी ।
आणी नेलें वाराणसी सिदोपंता ।। ९५॥ गिरजावाई सवे रुक्माई घेतली ।
या उभयां भेदी केली वधुवरी ॥ १२॥ आज्ञापिले तेव्हां चैतन्याश्रमासी ।
रहार्वे सहवामी स्त्रियेचीये ।। ९३ ॥ जंव चवथें अपत्यें होती ईचे कृसीं । तंव
तुह्मी उदासी नये होऊं ।। ९४ || दंड कुमंडलू घेतला हातींचा । आणि केला
उभयतांचा मेळापक ।। ९५ ॥ करूनियां यात्रा अाले अलंकापुरासी । कन्या
जामातेसी मिदोपंत ॥ १६ ॥ या देखोनि प्रांत उपहासिले बहुत जनीं ।
ह्मणती याते नयनीं पाहों नये ॥९७ ।। सन्यामी होऊनी भार्येसि संबंध । स्वप्न
हे निपीद्ध नदेखावें ॥ ९८ ॥ वनिता आणी घरीं आणि वाहेरि सन्यासी ।
अतळता यासी प्रत्यवाय ॥ ९९ ॥ कामलोभी तरी कां जाहला
सन्यासि । नेले पूर्वजास अधःपाता ॥ १०० ॥ हरिले शिखा सूत्र बर्ण
याति गोत्र । गृहदारादी सर्वत्र त्यजुनीयां || १ } आणी घेउनीयां पत्नी
पहुडे हा शेजेसी । पापात्मा सन्यामी पापरूपी ॥ २ ॥ विटाळ मानीती
सर्वही दर्शनाचा । ह्मणती हा पतीताचा शिरोमणी ॥ ३ ॥ वुडबीले
स्वधर्म चतुर्थाश्रमासी । इहलोक परत्रास आंचवला ॥ ४ ॥ विटविली
काया नामीला परमार्थ । वैदवाद्य अनर्थ केला येणे ।। ५ ।। धीक ऐमें
जीणे म्हणती स्त्रियावालें । नेली उभय कुळे निरर्यवामी ॥ ६ ॥ उदगोनी
पदकर्मा त्यजीले शिखामूत्र । आणि अपंगीले कलत्र परिग्रहो ॥ ७ ॥ परि
तो कोणासही न बोले वचन । सर्वदा लषोन वसे गुंफे ॥ ८॥ नैवेद्य
वैश्वदेव नाहीं स्मार्ताधान । श्राद्ध ब्रह्मयज्ञ विवर्जित ॥ ९ ॥ तयाची
संतती मुळे चौघे जणें । प्रायश्चित्त कोणें कैसे द्यावें ॥ १० ॥ वडील
निवृत्ती दुजा ज्ञानदेवो । तिजा सा पानदेवो मुक्ताबाई ॥ ११ ॥ वाची-
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/348
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
