पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/347

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विप्रकुळे ॥ ५० ॥ आपे गावकर गोवींदपंत निराई । आणि सिदोपंत गिर- जाई अलंकापुरि ॥ ५५ ॥ ते श्रीगैनीनाथाची शुद्ध सांप्रदाई । परि येर येरां नाहीं परिचय कदा ॥ २२ ॥ या गोविंदपनाउदरीं वंशाचा उद्धार । उपजला कुमर विठ्ठलनामें ॥ ५३ ॥ केला व्रतबंध पढवीला अक्षर । वेदां- तादी सार सांख्ययोग ॥ २४ ॥ परमार्थीक ग्रंथ पाहीले गुरूमुखें । अध्यात्म निजमुखें विराजला ॥ ५६ } परम विरक्त ज्ञानीया सात्वीक । ब्रह्मचर्य निहुँक व्रत चाळी ॥ ५६ ॥ मातृपितृभक्त परम सुशीळ । नेदी अहंता मळ लागो आंगीं ॥ २७ ॥ परी जावें रामेश्वर उत्कंठीत भनी । मग तीर्थरूपा पुसोनी निघतेझाले ॥ २८ ॥ ब्रह्मचर्य व्रत त्रिकाळ साधन । स्नान अर्घ्य दान करित चाले ॥५९ ॥ गोदा उभय तीरें तीर्थं अवलोकीली । पहें चाली केली भीमातीरे ॥ ६८ ॥ मधुकर भिक्षा अनताप अथीला । तो अलंकापुरा आला अकस्मात ॥ ६ ॥ तच तेथे गिरजाई होते सिदोर्पत । परम भागवत स्वधर्मशील ।। ६२॥ तयासी संतती होते कन्या रत्न । रुक्माई आभाधान नाम तीये ॥ ३३ ॥ ती ही विठोबाची देखोनियां स्थिती । कन्या दिधली हातीं मैकल्पूनी ।। ६४ ॥ करूनियां लग्न शुद्ध कन्यादान । केली समर्पण रुक्माई या ॥ ६५ ॥ मग ते तीथवासु गेले रामे- श्वरा । करूनीया ईतरा दक्षीण तीर्था ।। ६६ ।। सर्वेचि तेथुन गेले वारा- णसी । तंव ऐकिलें बातेंसी गांवींचीये ॥ ६७ ॥ श्रीगोविंदपंतासी देवाज्ञा झाली । मग उत्तरकार्य करुनीं गयेसी गेले ॥ १८ ॥ गयावर्जनाचा पा- दिला विधी । जाले शुद्धावृद्धी विरक्तीवळे ॥ ३९ ॥ ऋणयापासुनी झाला तोही मुक्त । मग आले ते पुनरुक्त महाक्षेत्रा ॥ ७० ॥ विरक्त मानसी अनु- तापाचे बळ । वैराग्य निर्मळ अंतरनिष्ठ ॥ ५५ ॥ मठी नृसिंहाश्रमासी जाऊ नियां शरण । केळे विसर्जन ग्रहस्थाश्रमा॥ ७२ ।। सर्व प्रायश्चित केला पो- चार । नासले वीकार साही वैरी ।। ५३ ॥ पृर्वाश्रमाचें सागुनियाँ नाम जाले चैतन्याश्रम यती धर्मे ।। ७४ ॥ शारी नारायण उदरीं नारायण गायत्री नारायण सर्वसंधी॥ ५५ ॥ जनीं नारायण विजनी नारायण । वदनीं नारायण सर्वकाळ ॥ ७६ ॥ सद्गुरूसेवन राहीले सतत १ ते ऐकी- येली मात सिदोर्पतीं ॥ ७७ ॥ करूनियां खेद उभय दंपस । हृदयीं रुक्मा- ईते आगिती ॥ ७८ ॥ ह्मणती सर्वाविसी तुझे वो अनहीत । आह्मीची ते नेणत केलें मुर्ख ॥ ७९ ॥ पथिक विरक्त आला तीर्थवासु । तो देखो- नियां उदासु दिधलें तुज ॥ ८० ॥ होणार ते बळीवंत होऊनियां गेलें ।