पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७५ ) ॥ १३३२ कोटें चि हा नसे कोठे ही न दिसे । कोठे चि अमुकासे न ह्मणे कोणी ।। १ ।। कोठे याचे होणे कोठे याचे निमणे । कोठुनी येणे जाणे न तर्कची ॥२॥ कोठे याची स्थिति कोठे याची भीति । कोठे याची वसात न कळे कोणा ।। ३ ।। कोठाने याचे मूळ कोठुन याचे कूळ । वर्णावयास आढळ न कळे गोत्र ॥ ३ ॥ निळा ह्मणे याती न दिसे रूपाकृती ।नयेचि कोणे व्यक्ती विचार करितां ॥ ५ ॥ | ॥ १३३३ ।। आप अपणा नेणता । निम ब्रह्मांडाच्या चळथा ॥ १ ॥ काय सांग नवलपरी । ऐमी याची आकळ चोरी ॥ ३॥ अंगे आपण निराकार । प्रकटोनि दावी जगदाकार ॥ ३ ॥ निळा ह्मणे महर्षि देवा । न कळती ऐशी याच्या मात्रा ॥ ४ ॥ ॥ १३३४ ॥ बहुरूपी हा एका । नानाकारें नटें नटला ॥ १. ।। पुरूषा- कृति स्त्रिया वालें । होउनी काम ही सातळे ।। २ । नामें +7 नस्त्राभरणें । रसस्वाद नाना खाणे ।। ३ ।। निळा ह्मणे फळे पुष्पें । पर्णे मूळे भिन्न चि रूपें ॥ ४ ॥ ॥ १३३५॥ इंद्रियांची पुरी धांव । मनासी ठावे विश्रांति ॥ १ ॥ तया नांव ब्रह्माप्ति । जेथे उपरति चित्ताचः ॥ २ ॥ बुद्धीची ही जाणीव विरे । तर्क मतांतरें मुरडली ।। ३ । निळा ह्मणे कुंठित गती । पांगुळले ती पंचप्राण ॥ ४ ॥ ॥ १३३६ ॥ आत्मा करी ना करवी । अलिप्तपणे वर्ते जीवीं ॥ १ ॥ साक्ष नव्हे ना असाक्ष । उपेक्षा करीना कैंपक्ष ॥ २॥ जैसे गगनीं अभ्र गळे । गगन अलिप्त त्या वेगळे ॥ ३ ॥ निळा ह्मणे सन्निधानें । लोह चाले चुवक नेणे ॥ ४ ।।। ॥ १३३७ । नाहीं चि उरला रिता । ठाडो याविण तत्वता ॥ १ ॥ अणू रेणू महदाकाश । याहिमाजी याचा वास ॥ २ ॥ होतां जातां सह- सवरी । ब्रह्मांडाच्या भरोवरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे अखंडता । नव्या जुन्याही हा परता ॥ ४ ॥ ॥ १३३८ ॥ येती जात होती मरती । नानाकार भूतव्यक्ती ।। १ ॥ हा तो आहे जैसा तैसा । अनादिरूपें आपणा चि ऐसा ॥२ ।। नहानियां