पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बांदी एका । लाविल्या फुका रिद्धी सिद्धी ।। ३ ।। निळा अणे सर्वाधि- कारी । प्रेम भांडारी भक्त केले ॥ ४ ॥ | ॥ १२१३ ॥ कैली कीर्ति अलोलिक । फुटली हक त्रैलोक्य ॥ १ ॥ दोपी दुराचारी जन । केले पावन दर्शनें ॥२॥ नामासाठीं मुक्ति फुका । हो ही नेटका बहिवार ।। ३ । निळा ह्मणे यात्रेसी येती । ते ते होती कृतार्थ ॥ ४ ॥ |॥ १२१४ ॥ सर्व तीर्थं चहूं भागें । होती अंगें मुन्नात् ॥ १ ॥ देव उभा ह्मणोनी तारीं । सरोवरीं महिमा हा ॥ २ ॥ सकळां तथा अधिष्ठान । ईटे चरण शोभले ॥ ३ ॥ निळा ह्मणे विठ्ठल ह्मणतां । सायुज्यता घर रिघे ॥ ४ ॥ ॥ १२१५ ॥ आले भेटी संत जन । गजे गगन हरिनामें ॥ १।। टाल विणे मृदंग भेरी । छबिने अंबरी झळक ॥ ३ ॥ विठ्ठलदेव धांवती पुढे । भेटती कोडे जिवलगा ॥ ३ ॥ निळा ह्मणे आलिंगने । नव्हती भिन्न वेगळे ॥ ४ ॥ | ॥ १२१६ । एक एका अवलोकिती । एक मिसळती एकांत ॥ १ ॥ संत ते चि झाले देव । संत देव विराजे ।। २ ।। येरायेरा मिठी घटे । आतां निवडे तें कैसें ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तिसुखें ! झाले सारखे उभयतां ॥ ४ ॥ | ॥ १२१७ ॥ ज्याचें करुनियां चिंतन । संत चरणीं होती लीन ॥ १ ॥ सो ही चंद्रभागे तीरीं । ठेऊनी हात कटावरी ॥२॥ उभा राहिला तिष्ठते । चाट भक्तांची पाहात ॥ ३ ॥ निळा ह्मणे मुनिजनां । ज्याची निय उपासना ।। ४ ।। || १२१८ । आराधिला पुंडलिकै । जननी पृज़नियां जनकें ॥ १ ॥ त्याच्या भावासी भुलला । भेटी धांवोनियां ला || २॥ सहस्र सोळा परिवारेसी । वस्ति केली तयापाशीं ॥ ३ ॥ निळा झणे पाचारिले । देव- समुदाय आणिले ॥ ४ ॥ ॥ १२१९ । पाहा भूवैकुंठ पंढरी । धरिली सुदर्शनावरी ।। १ ।। कैमा महिमा वर्णावा । जेथे वास विठ्ठल देवा ॥ ६ ॥ संत सनकादिका