( २५७ )
योगी । निये कीर्तन किती ॥ ३ ॥ निळा म्हणे सात्विक जन । तरती
पातकी पावन ॥ ४ ॥
॥ १२२० ॥ धन्य धन्य पुंडलिका । केला तरणोपाय लम्का ।। १ ।।
एका दर्शनें चि उद्धार । केळे पावन चराचर ॥ ३॥ चंद्रभागा पंढरपुर ।
भक्त आणि हरिहर ॥ ३ ॥ निळा म्हणे सुलभ केलें । भूमी वैकुंठ
आणिलें ॥ ४ ॥
॥ १२२१ ॥ दर्शना धांवोनियां जे येती । तयां मुक्ति वोलंगती ॥ १ ॥
में जोडूनि ठेविलें । युगायुगी उभे केले ॥ २ ॥ हृत्कमळीं ब्रम्हादिक ।
ज्यानें पूजिती सनकादिक ॥ ३ ॥ निळा म्हणे कीर्ति घोष । न संडे
त्रैलोक्य उल्हास ॥ ४ ॥
॥ १२२२ ।। सुते सनकादिक देव । भेटावया आले मुर्व ।। १ ।। देवा
भक्तांतें पूजिती । महिमा अद्भूत तो वाँणती ।। २ ।। पावन केली पुंडलिकें।
म्हणती नरनारी बाळके ॥ ३ ॥ निळा ऐकोनियां ते वाणीं । मिठी घालू
धावे चरणीं ॥ ४ ॥
| ॥ १२२३ ।। देवा भक्तांचा सोहळा । वाचे गाती वेळोवेळां ॥ १ ॥
म्हणती धन्य पंढरपुर । पुंडलीक मुनेश्वर ।। २॥ चंद्रभागा पद्मतीर्थ ।
वेणुनादी जन कृतार्थ ॥ ३॥ निळा म्हणे पांडुरंगा । भेटी तापत्रय
भंगा ॥ ४ ॥
॥ १२२४ ॥ चंद्रभागे करितां स्नान । होती पानी पानी ॥ १ ॥
पुंडलिकासी नमस्कार । करितां पूर्वजां उद्धार ॥ २ ॥ वेणुनादी काला
वांटी। तृप्ती पूर्वजां वैकुंठीं ॥ ३ ॥ निळा म्हणे पिंडदान । दक्षिण गया
अधिष्ठान ॥ ४ ॥
॥ १२२५ ॥ उमटलीं विष्णुपदें । यावर्जनीं जे प्रसिद्धं ॥ ५ ॥
नारद क्षेत्री पंढरपुरी । अद्भुत पदाची त्या थोरी ॥२॥ ऋणत्रयी मुक्त
जन । देतां पदीं पिंडदान ।। ३॥ निळा म्हणे गोपाळपुरीं । विठ्ठल वेणु
वादन करी ॥ ४ ॥
| ॥ १२२६ ॥ पुष्पवतीच्या संगम । नारद मुनीच्या आश्रम ॥ १ ॥
विष्णु आपण क्रीडा करी । उमटली पर्दै नैं गोजिरीं ॥ २॥ गाई गोपाळ
।
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/298
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
