पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। ११२७ ॥ नावडे पंढरी । कथा करी दारोदारी ॥ १ ॥ नको याचे संभाषण । वादे भेटीसवें शीण ॥ २ ॥ सांगै ब्रह्मज्ञान वरी । नाहीं प्रेम में अंतरीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे पोटभरू । उगे चि करिती गुरुगुरु ॥ ४ ॥ ॥ ११२८ । नादळे कधी ही पंढरी । नका सांगों याची थोरीं ॥ १ ॥ मिथ्या करिती ते चार । सोंग कथेचा विस्तार ॥ २ ॥ नाहीं प्रेमा पांडु- रंगीं । चित्त विषयसेवा भोगी ।। ३ ॥ निळा ह्मणे दावी जैमें । नाहीं अंतर झाले तैसें ॥ ४ ॥ | ॥ ११२० ॥ ऐसी चि देखिलीं उदंडें । जो सांची काळी तोंडें ॥ १ ॥ मुखें सांगती परमार्थ । स्वार्थ अंतरीं अनर्थ ॥२॥ अनुताप दाविती वैराग्ये । वरी अंतर्बाह्य रंगे ॥३॥ निळा ह्मणे उगी चि रीति ! पडली संसारीं कथिती ॥ ४ ॥ ॥ ११३० । कोण तया लेखी । नाहीं विठ्ठल ओळखी ।। १ । करिती तितुकें पोटासाठीं । गाणे नाचणे आटाआदी ॥ २ ॥ कळा दाविती व्युत्पत्ती । चातुर्य जाणिवेची संपत्ती ।। ३ ।। निळा ह्मणे संतांपुढे । येतां लाजती ती माकडें ॥ ४ ॥ || ११.३१ ॥ निर्भीड बोलणें । ज्याचें आपस्वार्थी जिणें ॥ १ ॥ याचिये संगतीचे फळ । होय चित्तासी खळबळ ॥२॥ परदुःख नेणतो।। करी परान्ने पुष्टता ॥ ३ ॥ निळा ह्मणे दावी सोंग । ऐमा त्यजावी मातंग ।। ४ ।। ॥ ११३२ ॥ होईल अंग वळ । तरी फजीत करावे ते बळ ।। १ ॥ जे कां करुनियां पावड । लटिकें चि वादविती वंड ॥ २ ॥ भोंदिती भाविकां । कथुनी परमार्थ तो लटिका ॥ ३ ॥ निळा ह्मणे तोंडे सांगे । तैसे नाचरोनियां अंगें ॥ ४ ॥ ॥ १.१३३ ॥ जाणिवेचा झाला हुंद । भाग्यमंद नेणे तो ॥ १ ॥ सांग- तां हि न मानी हित । करी आघात आपुला ॥ २ ॥ भनी आला अर्थ काढी । ओढ़े औदी अहंतेचे ।। ३ ॥ निळा ह्मणे द्वैतबुद्धी । नये तो कधीं परिपाका ॥ ४ ॥ ॥ १.१३४ ॥ तत्वता न कळे । आलें मना ते चावळे ॥ १ ॥ खरियासी मानी