पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/286

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २४६ ) खोटें । खोटें खप्या ऐसे वाटे ।। २ ।। अंध न देखे निवाडु । तम तैसा हा चि उजवड ॥ ३॥ निळा सणे बुद्धि मलिन । नेणे पाप की हे पुण्य ॥४॥ | ॥ ११३५ ॥ चातुर्य मिरवी । कळा व्युत्पत्ति दाखवी ॥ १ ॥ परि तें अवधं वांया गेलें । एका न भजतां विठ्ठले ॥२॥ गायनाची कळा । असने मुद्रेचा सोहळा ॥ ३ ॥ निळा ह्मणे जें जें करीं । सोंग चि ते ते अवधे वरी ॥ ४ ॥ | ॥ १.१३६ ॥ व्युत्पत्तीचे ज्ञान । सांचवणी ते जीवन ॥ ५ ॥ नव्हे पांडुरंग कृपा । नाना मंत्रे करितां जषा ॥ २॥ उपवास पारण । नाम उच्चारिता वाणी ॥ ३ } निळा ह्मणे न पवे मेवा । ऐसी सर्वात्मिका देवा ॥ ४ ॥ | ॥ ११३७ ॥ जें जें बोले ते विकळ । नाहीं विठ्ठल कळवळ ॥ १ ॥ कोरडें चि शब्दज्ञान । नाहीं प्रेमाचे जीवन ।। २॥ जाणे तर्क वितर्क मति । समर्पक समय स्फूर्ती ॥ ३ ॥ निळा ह्मणे पडली हातीं । जाणीवेच्या नुगवे गुंती ॥ ४ ॥ ॥ ११३८ ॥ जाणिवेचें ज्ञान । तर्कवादाचे जल्पन ॥ १ ॥ काय करू तो गोमटा । भरला अहंकाराचा फांटा ॥ २ ॥ वोले तें तें ताये साये । नेणे परमार्थाची सोये ॥ ३ ॥ निळा ह्मणे तैसी चि गती । पावे आपुलिया मती ॥ ४ ॥ | ॥ ११३९ ।। बोलणे परमार्थ । आशा अंतरीं अनर्थ ॥ १ ॥ काय करू ते व्युत्पत्ती । बहुरूप्याची संपत्ती ॥ ३॥ रसाळ वाचेमी बोलणे । माळा मुद्रांचीं भूषणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे गेली । वांया न भजतां विठ्ठलीं ॥ ४ ॥ | ॥ ११४० ॥ आणिकांतें उपदेशी । आपण मलिन मानसीं ॥ १ ॥ बोले ते ते धूर्त वादें । लटिक्या चि प्रेमें रडे स्फंदे ॥ २ ॥ सोंग परमार्थ हा सार । आशा अंतरीं विखार ॥ ३॥ निळा ह्मणे देहाभिमानें । गेली भोगिती ते पतनें ॥ ४ ॥ | ११४१॥ नेणोनियां आत्महित । करिती घात अभिमानी ॥ १ ॥ नसती च वाढवुनियां उपाधी । पडती मधीं संदेहा ॥ ३॥ नाठवुनियां विठ्ठल देवा । करिती सेवा भूतांची ॥ ३ ॥ निला ह्मणे जन्मोनि गेला । वृथा चि पडिला निरयांत ॥ ४ ॥