( ३४३ )
॥ ११२० ॥ नीच यातीस संगती । अवहे ज्या अहोराती ॥ १ ॥
तो चि ओळखावा दोषी । दुराचारी पापराशी ॥ २ ॥ नेणे आपुला
विधिधर्म । करी मना लें कर्म ॥ ३ ॥ निळा सणे नर्कवासी । करी
घालुनी पूर्वजांसी ॥ ४ ॥
॥ ११२१ । आणिकाची संपत्ती । देखोनि दुःख पानी चित्तीं ॥ १ ॥
ऐसा पातकी चांडाळ । अशुचि तो सर्वकाळ ॥२॥ करी सजनाची निंदा ।
आपण दरिद्रीं सर्वदा ॥ ३ ॥ निळा ह्मणे सहजे गांठीं । बांधी यातनेच्या
कोटी ॥ ४ ॥
|| ११२२ ॥ वदवी असत्याची वाणी । माजि निदेची पुरवणी ॥ १ ॥
जळो जळो याचे तोंड । पचते पापाचे चि कुंड ॥ २ ॥ कुश्चिळ सर्वदा
अंतरीं । इतरांचिया घातावरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे भोगिल पीडा । नर्क-
वासी होउनी किडा ॥ ४ ॥
॥ ११२३ ॥ वर्माचा चि स्पर्श करी । शुद्र धमनियां अंतरीं ॥ १ ॥
न धरी पातकाचे भय । नेणे पुढे होईल काय ॥२ ।। इच्छी सदा अभ्यंतरीं ।
परधन पराचिया नारी ॥ ३ ॥ निळा ह्मणे यांची भेटी । होतां सुकृताची
आटी ॥ ४ ॥
॥ ११२४ ॥ पिसाळलें धान । इसे भुलया वसवम्मुन ॥ १ ॥ नेणे
आपुले पारिखे । घारले ते आपल्या दुःखें ॥ २ ॥ सुरापान भुलोनि जैसा।
भोगी आपणा आणिकासरिसा ॥ ३॥ निळा ह्मणे तैसी परी । जिवितां
महा मूर्ख करी ॥ ४ ॥
| ॥ ११२५ ॥ नाहीं विठोबाचें प्रेम । गाणीव श्रम वृथा चि तो ॥ १ ॥
काय करिती आपुल्या दैवा। भुली वैभवा जाणिवेच्या ॥ २ ॥ भरावें
पोट हें चि जाणती । नरदेहा धाडिती व्यर्थ वांया ॥ ३ ॥ निळा ह्मणे
गिळिलें कर्मे । पुढे मरणजन्में अनिवारें ॥ ४ ॥
॥ ११२६ ॥ आतां अभक्त कातर । मळिन जयाचें अंतर ॥ १ ॥
दाऊनियां वरदळ वैष । मना अंगी आशापाश ॥ २ ॥ वाचे सात्विक
बोलणें । विषयी वासनेचे ठाणे ॥ ३ ॥ निळा ह्मणे घेउनी सोंगें । मिरवे
चार करीत जगे ॥ ५ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/284
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
