१ २३० }
दैव चि होती । विस्मरणें जाती अधःपाता ॥३॥ निळा म्हणे ममता
बाधी । निय समाधी निःसंगा ॥ ४ ॥
| ॥ १०४६॥ अंतर कोणा नेदी सहसा । आपुलिया दासा सांभाळी
॥ १ ॥ परम कृपावंत हरी । नामोच्चारी प्रगट होय ॥२॥ याची निष्ठा
बाणली ज्यासी । कदाहि खासी न विसंवे ॥ ३॥ निळा म्हणे जवळ चि
राहे । ऐसा भक्त मोहें मोहितु ।। ४ ।।
॥ १०४७ ॥ विश्वास याचा न वाटे जया । विन्मुख तया नरदेहो ॥१॥
जाईल भोगावया योनी । दुःखदायिनी चौ-यायशी ॥ २ ॥ पुढती जन्म
पुढती मरण । पुढती पतन अधःपात ॥ ३ ॥ निळा म्हणे पड़ती फेरा ।
यातना थोरा भोगावया ॥ ४ ॥
| ॥ १०४८ ॥ जाईल तेथे तें चि फळ । दुःख कल्लोळ यमजाच ॥ १ ॥
हरिभक्तीसी विन्मुख होती । ते ते जाती अधःपाता ॥ २॥ दुःख शोक
व्याधी पीडा । अपघात रोकडा हा चि यासी ।। ३ । निळा ह्मणे सुकृत
नेणें । वेष्टिले गुणे मायेचिया ॥ ४ ॥
| ॥ १०४९ ॥ सार्थकाचा ऐसा काळ । केला अमंगळ मूढ़ जनीं ॥ १ ॥
येउनियां नरदेहासी । नेणें स्वहितासी आपुलिया ॥ २॥ धिक खाचें
झाले जिणें । विना स्मरणे श्रीहरिचया ।। ३ ।। निळा ह्मणे याची जोडीं ।
अवघी कुळवाडी पापात्मक ॥ '४ ।।
॥ १०५० ॥ ऐकोनियां भक्तवचनें । देव संतोपले मनें ॥ १ ॥
म्हणती आहे नामापासीं । संदेह न धरावा मानसीं ॥ २ ॥ संत बोलिले
तें खरें । साच चि मानावें उत्तरें ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतोपविलें । कृपावच-
नीं या विलें ॥ ४ ॥
| ॥ १०८१॥ आतां अवघे हरिचे जन । करा हो चिंतन नामाचें ॥ १ ॥
देव नुपेक्षील सर्वथा । करा कथा कीर्तनें ॥ २ ॥ टाळ मृदंग लावा भेरी ।
नाचा गजरी हरिनामें ॥ ३ ॥ निळा ह्मणे वैकुंठवासी । येती भेटीसी
तुमचीये ॥ ४ ॥
॥ १०५२ ॥ पाहोनियां हरिकीर्तन । होती प्रसन्न देव तुम्हां ॥ १ ॥
सनकादिक येती भेटी । कथा गोमटी ऐकावया ॥ ३ ॥ संत महंत येउनी
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/271
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
