पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२९ ) ॥ १०३९ ॥ संत आज्ञा सादवित । जातों सकळांचे हि हित ॥ १ ॥ नाईकोनी सोडाल । फळ कनिष्ठ तरी पावाल ॥ २॥ आह्मी उत्तीर्ण आपुलिया । उचिता ठेलों सांगोनियां ।। ३ ।। निळा ह्मणे यावर आतां । बोल न ठेवावा मागुता ॥ ४ ॥ ॥ १०४० ।। ज्ञापिॐ ॐ श्रीहरी । ते चि बदली हे वैखरी ॥ १ ॥ नाहीं माझे येथ वीर्य । जाणे ज्याचें तो चि कार्य ।। २ ।। येईल जरी है। प्रतीति । धरा तरी हैं हित चि चित्तीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांडिजे येरी ।। नास्तिक वादी परते दुरी ॥ ४ ॥ ॥ १०४१ ॥ याच पायीं मनोरथ । पूर्ण काम सकळ हि आर्त ॥ १ ॥ ह्मणोनियां धरिला जिवें । हा चि संत मनोभावें ॥ २॥ इच्छिलिया पदा । नेतो देउनी मुख संपदा ॥ ३ ॥ निळा ह्मणे खंडी मूळ । वासनात्म- काचे तात्काळ ॥ ४ ॥ ॥ १०४२ ॥ अवधिया चि ज्ञाने अवघीं चि जाणे । परि एक ने आत्मज्ञान॥ १ ॥ बोल तितुके बोल चि बरी । परि न चढे पायरी प्राप्तीची ॥ २॥ आपुलें चि हित आपण नेणे । वरी आणिकां शाहाणे करू धांवे ॥ ३ ॥ निळा म्हणे ठकुनी लोकां । आपण हि न जात सवें ॥ ४॥ | ॥ १०४३॥ चाडिया मुखें दाणा पड़े । तर तो निवडे कणभारें ॥१॥ तैसे कडवळ फोकिलें नोव्हे। सोंपट चि राहे वादोनियां ॥ २ ॥ तैसे सङ्गुरुमुखीचे वचन ! पाववी निज स्थान पदातें ॥ ३ ।। वाचाळ ज्ञाने ऐकतां गोष्टीं । वाउग्या चि शेवटीं भरोवरी ॥ ४ ॥ निळा म्हणे सांप्रदाय शुद्ध । उपजवी वोध गुरु शिया ॥ ५ ।।। ॥ १०४४ ॥ नाहीं वारी पळमात्र घडी । गेले कल्पकोडी याचिपरी ॥ १॥ आतां कधीं मोकळा होसी । मग या पावसी परमार्था ॥ २ ॥ पावनि उत्तम नरदेहर ऐसी । बहुवेळा आयुष्यासी नासियलें ॥ ३ ॥ निळा म्हणे' अधमा हिंडोनी योनी । त्रास नुपजे मनीं अझुन कैसा ॥ ४ ॥ ॥ १०४५ ॥ आशाबद्धा नाहीं मान । बहुत सन्मान नैराश्या ।। १ ।। याचिलागीं विचार करा । हित तें धरा मानसीं ॥ २ ॥ भजतां देवा