पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/272

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


१ २३१ ) पुढे । बैसती गाडे कीर्तनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे पांडुरंग । रंगी रंग मेलविल ॥ ४ ॥ ॥ १०५३ ॥ सोहळा तो देखोनियां । लागती पायां मोक्ष मुक्ति ।। १ ।। जये रंगी नाचे हरि । कीर्तनगजरी सत्संगें ॥ २॥ तेथे कोण पाड येरा । साधन संभारा तर्कवादा॥ ३ ॥ निळा ह्मणे योगयाग । ठाकती मुग आरोगुनी ॥ ४ ॥ ॥ १०५४ ॥ कीर्तने धुवट केलें लोकां । दोष कलंकापासुनी ॥ १ ॥ टालिया हरिनामाच्या घोपें । पळत जामें कलिमल ॥ २ ।। स्वानुभवें वेधल्या वृत्ती । श्रोते हि होत चतुर्भुज ॥ ३ ॥ निळा ह्मणे कीर्तन सुखें । इरिलीं दुःखें बहुतांचीं ॥ ४ ॥ ॥ १०५५ ।। कथाश्रवणें विरक्ति जोडे । निज शांती वादे उल्हासे ॥ १ ॥ कथाश्रवणें परमानंद । प्रगटे स्वानंद निज हृदयीं ॥ २ ॥ कथाश्रवणें उपाधी तुटे । भवाब्धी आटे निःशेप ।। ३ । निळा ह्मणे कथाश्रवणें । हरती मरणें जन्म जरा ॥ ४ ॥ ।। १०८६ ।। कथा श्रवणें स्वरूप सिद्धी । लागे समाधी सात्विकां ॥ १ ॥ ऐसा लाभ जोडे जोडी । बैसतां आवडी हरिकथे ।। २ ।। कथाश्रवणें परि- हार दोषां । होताती पाशमुक्त पाप ॥ ३॥ निळा ह्मणे इरिकथा श्रवण । करी बोळवण जन्ममृया ॥ ४ ॥ | ॥ १०५७ ॥ कथाश्रवणें उपजे विरक्ति । कथाश्रवणें वादे शांति ॥ कथाश्रवणें परमानंदप्राप्ति । पापी उद्धरती कथाश्रवणें ।। १ ।। कथाश्रवणे उपाधी तुटे । कथाश्रवणें भवाब्धि आटे ॥ कथाश्रवणें सच्चिदानंद भेटे । समूळ तुटे मायाजाळ ॥ २ ॥ कथाश्रवणें स्वरूपस्थिती । कथाश्रवणे विषय समाप्ती ।। कथाश्रवणें निजात्मप्राप्ती । होय उपरती कथाश्रवणें ॥ ३ ॥ कथाश्रवणे मीपण नुरे । कथाश्रवणें अभिमान विरे ।। कथाश्रवणें कल्पना हि झुरे । ब्रह्म साक्षात्कारें भेटिसी ये ॥ ४ ॥ निळा म्हणे प्रथम पायरी । इरिकथा श्रवण मनन वरी ।। निजध्यासे आत्मया हरी । भेटिजे निर्धारी साक्षात्कारें ॥५॥ | ॥ १०५८ ॥ संतोष तरुचे हे फळ । अलें रसाळ पकदशे ॥ १ ॥ सेविती ते कृप्त होती । ब्रह्मता पावती सनातन ॥ २॥ रुचि ऐसे आवडे