( २२१ )
॥ ९८३ ॥ पाप तया नांव परदारा गमन | पाप ते परधन अपहार॥ १ ॥
पाप तेंचि निंदा परपीडा द्वैष । पाप ते चि उपहास पुढिलांचे ॥ २॥ पाप
तेंचि जीवीं विषयाची आसक्ति । पाप तें अभक्ति कुलाचारी ।। ३ ।। निळा
ह्मणे पाप मुख्य तें चि साचें । नावडे देवाचें नाम मुखीं ॥ ४ ॥
॥ ९८४॥ किंचित् सुख आगळे दुःख । पावती अवश्यक व्यभिचारी
॥ १ ॥ क्षयो व्याधी भगे पडती । जगनिंद्य होती हे आधीं ॥ २ ॥ पुढे
राजा दंड करी । सर्वस्व हरी देखतां ॥ ३ ॥ निळा म्हणे हांसती लोक ।
थुकिती थुक तोंडावरी ।। ४ ।।
| ॥ ९८८ ।। भीड भाड जाय उडनी लौकिक ! शेवटींचा रंक तोही
दापी ॥ १ ॥ दावित तो तोंड लाने भरले सभे । मग वाळे उभें सल चि
जैसे ॥ २ ॥ सुहृद जन ते अवमान करितीं। निष्ठुर बोलती त्रासुवचनें ॥ ३ ॥
निळा ह्मणे मग होय दैन्यवाणे । हो काय तैसे जिणें भूमिभार ॥ ४ ॥
॥ ९८६ ॥ अहारे काय जोडी केली । नकसी धाडिलीं उभय कुळे
।। १ ।। उपजतां तुज संतोपले सर्व । वुडविलें नांव त्यांचे ही त्वां ॥ २ ॥
असत्याची चाचे सदा रावणुक । चोरी सिनजिक न मंडसी ।। ३ ।। निळा
सणे वृथा हाहाभूत जन्म । केला ऐसे अकर्म आचरोनी ॥ ४ ॥
॥ ९८७ ॥ पापासवें जिणे ज्याचें । वृथा चि त्याचे झालेपण ॥ १ ॥
भोगितां भोग रहे मग । ह्मणे मी जगनिंद्य झालों ॥ २ ।। सांगतां हित
नाहीं ऐकिलें । वडिलीं दाविलें विहित तें ॥ ३ ॥ निळा ह्मणे आतां पढि-
येला खोले । गिळीयेला काळे व्याधी सपें ॥ ४ ॥
| ॥ ९८८ ॥ अभशापास कारण । मुख्य संभाषण परस्त्रीचें ॥ १ ॥
सहज एकांत बोलू जातां । उपजे विकल्पता सकळांसी ॥ २ ॥ मग तें अप-
घातास मूळ । करी तात्काळ नवरत ॥ ३ ॥ निला ह्मणे प्रमादी ऐसी ।
अपदेपासीं अखंड ॥ ४ ॥
॥ ९८९ ॥ बाप बंधु वेगळा करुनी । इतरां लागुनी बाधक ॥ १ ॥
ह्मणोनि परांगनेसवें । सलगी नव जावें एकांतीं ॥२जरी उदंड दंडक
झाला । तरी तो त्याला नाडक चि ॥ ३ ॥ निळा ह्मणे ते विकल्पखाणीं ।
अमदा सज्जनी वालावी ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/262
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
