पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२० ) ॥ १॥ यांचा वारा लागेल ज्यासी । येत यासी मुक्तीही वकं ॥२॥ घडत यांचे अवलोकन । होती पावन महा पापी ॥ ३ ॥ निळा ह्मणे त्यांची भेटी । ते चि गांठी विठ्ठलेसी ॥ ४ ।। ॥ ९७८ ॥ उत्तम संचित होतें गांठीं । तेणें चि या भेटी संतांसवें ॥ १ ॥ सुकृतामी आली फळे । भावबळे लगटोनी ॥ २ ॥ याच्या भाग्या ले भाग्यें । लाधले संग संतांचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे पृर्णते आले । जिहीं या सेविलें संतचरणा ।। ४ ।। बोधपर अभंग, ॥ ९७. ॥ नको बोलों शब्द वावगे विवाद । अठवा गोविंद ध्यान मनीं ॥ १ ॥ सकळही तुमचे होईल कल्याण । जर या गाल गुण विठो वाचे ॥ २ ॥ लटिका चि वडिबार वोल जाल वाचा । तरि होईल काळाची अति क्रोध ॥ ३ ॥ निळा ह्मणे पहा विचारुनी दृष्टी । धरा हित पोट होईल तें ॥ ४ ॥ | ॥९८० ।। सांगेन ते हित धरा अवये मनीं । नका मानू कोणी विट याचा ॥ १ ॥ बरें शिकवितां वरें तें मानावें । वाईट यागाचें त्याग- वितां ॥ २॥ पुढे सुख विश्रांती मागे राहे कीति । ऐसिया पद्धति संतां- चिया ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवें बोलविलें बोल । घ्याल ते ते व्हाल सुखी अर्थ ॥ ४ ॥ ॥ ९८१ ॥ परस्त्रीसंगै घडती दोष । वुडे वंश पायें या ॥ १ ॥ यमधर्म घाली बंदी । नव्हे कधी सुटकासी ॥ २॥ पूर्वज अधःपतना जाती । मग ते शापिती अति क्रोधं ॥ ३ ॥ निळा ह्मणे पातित्य ऐसें । वरी संग दोर्षे परस्त्रीच्या ॥ ४ ॥ ॥ ९८२॥ पार्षे पूर्वज नरका जाती । पापें चि बुडती धर्म सकळ ॥ १ ॥ पायें चि कुळ भंगा जाय । वंशासी होय अपघात ॥ २॥ पायें चि यश कीर्ति पळे । पापें चि सोहळे दरिद्राचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे घडतां पायें चि पतनीं । पतडी यातन पृर्वजेसी ॥ ४ ॥