पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०८ ) तेंवि हरिभक्तांतें हरी । नेदी बुडों भवसागरीं ॥ २ ॥ गगने न पड़े स्तंभे- विण । तान्हा न फुटे चि जीवन ।। ३ । निळा म्हणे उदया येतां । न देखे अंधःकारातें सविता ॥ ४ ॥ | ॥ ८१७ ॥ सांडुनी गुणदोषाची मात । करावा संघात संतांचा ॥ १ ॥ साधकां हे मुगम वाट । वस्ति वैकुंठ पावावया ॥२॥ निस करितां हरिची कथा । दोषा दुरिता संहार ॥ ३ ॥ निळा ह्मणे धरिल्या चित्तीं । भाविकां लाभती स्वानुभव ॥ ४ ॥ | ॥ ८९८ ॥ देवासाठीं घेउनी जोग । अवघा चि भोग यजिपला ।। १ ।। ते चि एक बळिये गाढे । कांपे त्यांपुढे कळिकाळ ॥ २ ॥ आशा मात्र नाहीं यांसी । शांतिसुखासी लिगटले ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिच्या ध्यानें । गेले विसरोन देहभावा ॥ ४ ॥ ॥ ८१९ ॥ ते चि धन्य ते चि धन्य । सुकृती जन नरदेह ॥ १॥ जिद्द करुनी नामपाठ । भरला घोट द्वैताचा ॥ २ ॥ निरसुनियां ममता माया । कीर्तनें काया मक्षाळिली ॥ ३॥ निळी ह्मणे अंतरसाक्षी । केला कैं पक्षी जगाचा ॥ ४ ॥ ॥ ९०० । गर्जत जाती ब्रह्मानंदें । इरिचीं पदें हरिभक्त ॥ १ ॥ धाक त्यांचा काळच्या काळा । कांपे चळचळां देखोनी ॥ २ ॥ विबुद्ध अवचें करिती मान । तीर्थे वंदन चरणाचें ॥ ३ ॥ निळा म्हणे धन्य ते जगीं । झाले श्रीरंगी रंगतां ॥ ४ ॥ | ॥ ९०१ ॥ हरिच्या नामें हरिचे दास । झाले सकळिकांस वंद्य जग ॥ १ ॥ समोर त्यांच्या नये काळ । कळिचा अमंगळ म्हणउनी ॥२॥ वदनीं त्यांच्या निघतां घोष । पळती दोष इतरांचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे केली वाट । सोपी वैकुंठप्राप्तीची ॥ ४ ।। ॥ ९०२ ॥ मुक्ति येती धांवोनियां । प्रीतिं वरावया हरिभक्तां ॥ १ ॥ रिद्धी सिद्धी वोळगे येती । समागम इच्छित पुरुषार्थ ॥ २॥ शांति क्षमा दया सिद्धी । सारित उपाधी येऊनियां ॥ ३ ॥ निळा म्हणे निरहंकृती । न ढळे परती नैराशः ॥ ४ ॥ | ॥ ९०३ ॥ हरिच्या भजने हरिचे भक्त । झाले विख्यात भूमंडलीं ॥ १ ॥