( २०९ )
तरोनी आपण तारिलें आणिकां । वैकुंठनायका प्रिय झाले ॥ २ ॥ ज्यांचे
ध्यान मनीं हरी । राहिला निरंतरी दृष्टिपुढे ।। ३ ।। लिळा ह्मणे अवघे चि
सांग । केले उभय भोग भोगुनियां ।। ४ ।।
॥ ९०४ ॥ सांपली हे सुगम वाट । हरिचिया पाठ नापाचा ॥ १ ॥
ब्रह्मानंदें करिती चोप । कीर्तनी उल्हास नियानी ॥ २ ॥ इचिया प्रेमें
रंगोनियां गेले । देहींचे विसरले देहभाव ॥ ३ ॥ निळा ह्मणे निकोनि
काळा । भोगिती सोहळा वैकुंठीचा ॥ ४ ॥
| ३ ९०५ ॥ पुण्यपावन त्यांची वाणी । जगदोद्धरण प्रवर्तली ।। १ ॥
सद्विवेक अमृतपूर । चालती उद्गार वाचे ते ।। २ ।। भगवद्भजन परमार्थ
वाणी । जे वेद पुराण व मान्य ॥ ३ ॥ निळा ह्मणे अद्भुत रस । गोड
सारांश हितकतः ॥ ४ ॥
| ॥ ९०६ ॥ ऐकतां श्रवण परमानंद । उपमर्दे कंद मायेचा ।। १ ।। घोप-
गजरें गर्ने वाचा । जे अतिशास्त्राचा गुह्यार्थ ॥ २ ॥ परम रसाळ मधुराक्षरें।
चालती सुस्वरें इरिभजने ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुमंगळ । ऐश्वर्य कल्लोळ
प्रेमाचे ॥ ४ ॥
॥ ९२७ ॥ घडो याचा समागम । ज्याचे प्रेम विठ्ठल ॥ १ ॥ सहज
त्याच्या ऐकतां गोडी । परमार्थ पोट दृढावे ॥ २ ॥ अनुतापासी दुणीव
चढे । वैराग्य वाटे चढोवढी ॥ ३ ॥ निळा ह्मणे वादे भाव । संचरे स्वानु-
भव निजांगीं ॥ ४ ॥
| ॥९०८ । हाचिया भजने हरिचे जन । करिती पावन पतितांसी ।।१।।
ऐसा यांचा अगाध महिमा । निरुपमा तो न बर्णवे ॥ २ ॥ देऊनियाँ पर-
मार्थ सिद्धी । पावती पदी श्रीहरिच्या ।। ३ । निळा ह्मणे सत्संगसुख ।
गणितां अधिक परमामृता ॥ ४ ॥
॥ ९०९ ॥ अलभ्य लाभ ते सत्संगती । घरासी चि थेती चोजवित ॥ १ ॥
ज्याचे ध्यानीं मन देव । राहिला राव पंढरीचा ॥ २ ॥ त्याहून अधिक
आहे कोण । कालहि आपण सेवा करी ॥ ३ ॥ निळा ह्मणे तिफ़्ती द्वारीं ।
होउनी कामारी रिद्धी सिद्धी ॥ ४ ॥
॥ ९१० ॥ नित्यानंदाचिया घरा । विवेक पैल तीरा पावविती ॥ १ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/250
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
