पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०५ ) ॥ ८७५ ॥ तो चि वाणिती आनंद । परमानंद अंतरीचा ॥ १ ॥ जनीं। लावावया गोडी । कीर्ती परवडी पोकारिती ॥ २ ॥ आपण पावोनियां सुखा । आणिकां हरिखा मेळविती ॥ ३ ॥ निळा मणे निगमादिक । ज्याचे कौतुक वनिती ॥ ४ ॥ |॥ ८७६ ॥ पाहोनिया ले ठाव । संत गांव सुखाचा ॥ १ ॥ या चि दाविताती वाटा । मुगमा वैकुंठा जावया ॥ २ ॥ बन्या भोळ्या मात्विक लोकां । करुनी नेटका उपदेश ॥ ३ ॥ निळा ह्मणे परोपकारा । लागी वसुं- धर विचरती ॥ ४ ॥ ॥ ८७७ ॥ हें चि त्यांचे नित्य काम । दावणे धर्म विहिताचे ॥ १ ॥ क्याचें तय स्वाहित जोडे । ऐमें उघडे बोलती ॥ २ ॥ निःसीम पांडुरंग भक्ति । उपजे विरक्ति भाविकां ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसी वाणी । वदती पुराण प्रतिपाद्य ॥ ४ ॥ | ॥ ८७८ ॥ वैष्णव वसती जये स्थळीं । तेथे धुमाळी कथेची ।। १ ।। विठ्ठल देव नाचे उभा । दाटे सभा संतांची ॥ २ ॥ सुखी होती महानुभाव । पावती ठाव तत्पदीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे नारीनर । होती तत्पर पर मार्थी ॥ ४ ॥ ॥ ८७९ ॥ संतांपास अपार सुख । हरिखा हरिख बोसंडे ॥ १ ॥ बोलती वचनें तेचि वेद । शास्त्रानुवाद विहिताचे ॥ २ ॥ पुरातन ज्या ज्या उत्तम वाटा । दाविती चोखटा भाविकां ॥ ३ ॥ निळा ह्मणे यांचा धंदा । हा चि सर्वदा गुण वाणी ॥ ४ ॥ ॥ ८८० ॥ हरिकीर्तनाच्या योगें । आह्मांसी जर्गे जाणीजे ॥ १ ॥ नाहीं तरी होत ठावा । कोठे देवा कोणासी ॥ २॥ जेंवि वोहळासी प्रतिष्ठा । पावतां तटा गंगोदकः ॥ ३ ॥ निळा आणे प्रकाश दीप्ति । चंद्र- ज्योती वन्हीसंगे ।। ४ ।। | ॥ ८८१ ॥ संतांचा वास जये स्थळीं । तेथें रवंदळी पापाची ॥ १ ॥ काम क्रोध जाती विलया। ममता माया देशधडी ॥ २ ॥ तृष्णे कल्पनेचा गांव । वोस ठाव संदेहो ॥ ३ ॥ निळा ह्मणे अहंकारा । मद मत्सरा उरी नुरे ॥ ४ ॥ •