पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/247

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


|॥ ८८२ । गर्जविती भगवणीं । सर्वदा वाण नीति घोपें ॥ १ ॥ तेणें चि पावन करिती जगा । भवभयभंग पावनी ॥ २॥ भाग्याचे ते पावती तेथे । वसती जेथे हरिभक्त ॥ ३॥ निळा ह्मणे यांच्या गोठी । ऐकत कोटी सुखाच्या ॥ ४ ॥ ॥८८३ ॥ ऐश्वर्याची वचनाक्षरे । वदती मधुरै तत्वदर्ती ।। १ ॥ श्रवण करिती सात्विक लोक । पावती सुख कैवल्य ॥ २ ॥ भोगुनियां नित्यानंदा । सुखें निज पदा लिगटती ॥ ३ ॥ निळा ह्मणे हे संतसाधु । अर्तबंधु दीनाचे ॥ ४ ॥ ॥ ८८४ ॥ मार्ग दाउनी गेले आधीं । दयानिधी संत पुढे ॥ १॥ तेणे चि पंथे चालों जातां । न पडे गुंता को कांहीं ।। २ ।। मोडनियां नाना मते । देती सिद्धांतें सौरसु ॥ ३ ॥ निळा मणे ऐसे संत । कृपावंत सुखसिंधु ॥ ४ ॥ | ॥ ८८६ ।। सांपडली वाट । आम्हां वैकुंठाची नीट ॥ १ ॥ सहज वचनीं विश्वासता । संत संगती लागतां ॥ २॥ बारले दुर्घट । होते भ्रांतीचे कचाट ॥ ३ ॥ निळा म्हणे सुखी । झालों पूर्विली ओळखी ॥ ४ ॥ ॥ ८८३ ॥ सहज चि होत उभा । संतसेवेचिया लोभा ॥ १ ॥ तंव कादिला निक्षेप । हात दिला तो अमूप ।। २ ।। नाहीं चि अंत जया । किती माप लाजं तया ।। ३ ॥ निळा म्हणे दिवसराती । न पुरे करिता गणती ॥ ४ ॥ ॥ ८८७ ॥ केली पायवाट । उल्लेथिली मायाघांट ॥ १ ॥ जिहीं हरी आठविला । जिवे हृदय धरिला ॥ २ ॥ जिंकोनियां काला। वरि गेले भूमंडळा ॥ ३ ॥ निळा म्हणे ब्रह्मेशान । पाचोनी लाविलें निशाण ॥ ४ ॥ ॥ ८८८ ॥ ऐशिया मुखाची मांदुस । झाली रूपस विठाई ॥ १ ॥ मांडनियां इंटे ठाण | धारिला जघन द्वयकरीं ॥२॥ रूपाकृती मानव वेषु । ईशाईश जननी हे ।। ३ ।। निळा म्हणे भक्तांसाठीं । फिरे वाळुबंटी उघडी हे ॥ ४ ॥ | ॥ ८८९ ॥ देखोनियां संतमेळा । कीर्तन सोहळा धांव घाली ॥ १ ॥ आईकावया आपुलीं नामें । गुणसंभ्रमें नित नवे ॥ २ ॥ वैसोनियां प्रेम