पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/228

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( १८७ ) ॥ ७६१ । नेघ आम्ही कदा भुक्ति आणि मुक्ति । हरिनामी विश्रांती सर्व जोडे ॥ १ ॥ काय कराव्या त्या रिद्धी आणि सिद्धी । वाडग्या उपाधी भजनी गोंवा ॥ २॥ न लगे अम्हां कांहीं मान्यता बहु मान । जेणे अभिमान खवले अंगीं ॥ ३ ॥ निळा म्हणे दुरी दुराऊ जाणीव । न लगे शहाणीव नाहील ते ॥ ४ ॥ ॥ ७॥२॥ एक गाऊ आह्मी विठोबाचें नाम । सकळ हि धाम मंग- काचें ॥ १ ॥ इतर साधने फळ काम देती । पुनरपी आणिती गर्भ- वासा ॥ २॥ योग याग स्वर्ग काम फळदाते । ह्मणोनियां सांतें दूषित संत ॥ ३ ॥ निळा ह्मणे नाहीं विकार हरिनामा । पाचवी निज धामा स्वास्ति क्षेम ॥ ४ ॥ ॥ ७६३ ॥ अल्ला स्वानुभवा । बहुतांसी हा आहे ठावा ॥ १ ॥ उच्चार या हरिनामाचा । तरणोपाव चि भवसिंधूचा ॥ २ ॥ सांगितला संत । प्रतिती पाहोनियां अंतीं ॥ ३ ॥ निळा म्हणे निश्चयाचा । सुगमोपात्र हा मोक्षाचा ॥ ४ ॥ |॥ ७६४ ॥ इरिचें नाम चि एक पुरे । सकळां साधनांचिये धुरे ॥ १ ॥ पावावया वैकुंठासी । लहान थोरां विश्वासी यांसी ॥ २ ॥ न लगे जाणे वनांतरी । सांडोनियां घरादारा ॥ ३ ॥ निळा म्हणे मुक्तिपदा । जावयाची हे संपदा ॥ ४ ॥ ॥ ७६५ ।। नामाचे चि घोष । करुनी निर्दोलिले दोष ।। १ ॥ चाट घेणा वाल्हाकोळी । अजामेळा पडतां जळीं ।। २ ।। गणिका आणि पशु गज । प्रल्हाद दैत्याचा आत्मज ॥ ३ ।। निळा म्हणे प्रसिद्ध ख्याती । नामापासी भुक्ति मुक्ति ॥ ४ ॥ ॥ ७६६ । तरले तों असंख्यात । सांगों जातां न लगे अंत ॥ १ ॥ एका हरिच्या नामसाठ । भरल्या विमानाच्या कोटी ॥ २ ॥ नाना याति स्त्रिया पुरुष । वनचर श्वापदादी राक्षसे ।। ३ ।। निळा ह्मणे कीटक पतंग। पावले नामें पद् अभंग ॥ ४ ॥ ॥ ७६७ ।। आतां हि जे गाती नामें । ते पावती निजात्मधामें ॥ १ ॥ ऐसी नामा अंग शक्ती । आहे ठेविली श्रीपति ॥ २ ॥ मुख्य पाहिजे